चंदीगढ -ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी यांच्याविरोधात चक्क पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. महिला वकील असून तीचे पलविंदर कौर आहे. युवराज हॅरीने लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण न केल्याचे महिलेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. युवराज हॅरीवर कारवाई करण्याची मागणी महिलेने केली आहे.
अनोख्या अशा प्रकरणावर न्यायमूर्ती अरविंद सिंह सांगवान यांनी सुनावणी केली. मला वाटते की ही याचिका राजकुमार हॅरीशी लग्न करण्याच्या एका दिवसाचे स्वप्न पाहण्यापेक्षा काहीच नाही. याचिका अत्यंत निकृष्ट मार्गाने तयार केली गेली आहे. यात वकिलाच्या ज्ञानाचा अभाव पाहायला मिळत आहे. याचिकेत याचिकाकर्ता आणि प्रिन्स हॅरी यांच्यात काही ईमेलचा उल्लेख आहे. ईमेल पाठविणार्या व्यक्तीने स्व:ताची ओळख हॅरी अशी दिलेली पाहायला मिळाली. त्याने महिलेशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचे इमेलमधून स्पष्ट होत आहे.