महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'एका वर्षात 1 हजार अॅलोपॅथी डॉक्टरांना आयुर्वेदात रुपांतरीत करेन' - रामदेव बाबा

रामदेव बाबा यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येत्या एका वर्षात 1 हजार अॅलोपॅथी डॉक्टरांना आयुर्वेदा रुपांतरीत करेन, असे ते बोलत असल्याचे व्हिडिओमधून ऐकायला मिळतयं.

रामदेव बाबा
रामदेव बाबा

By

Published : May 28, 2021, 4:11 PM IST

डेहराडून -आयएमए उत्तराखंड आणि योगगुरु बाबा रामदेव यांच्यात सुरु झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. अॅलोपॅथीला 'स्टुपिड आणि फालतू विज्ञान म्हटल्याप्रकरणी बाबा रामदेव यांना 1000 कोटी रुपयांची मानहानी नोटीस आयएमए उत्तराखंडने पाठविली आहे. यातच रामदेव बाबा यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येत्या एका वर्षात 1 हजार अॅलोपॅथी डॉक्टरांना आयुर्वेदात रुपांतरीत करेन, असे ते बोलत असल्याचे व्हिडिओमधून ऐकायला मिळतयं.

हरिद्वारमधील योग ग्रामध्ये दररोज 1 हजार लोक सकाळी योगा करतात. ऐवढे सगळे लोग एकत्र येत असल्याने अनेकांना समस्या निर्माण होत आहेत. मात्र, रुग्णालये खुली असतात. तर मग आयुर्वेदीक सेंटर का नाही खुले राहू शकत, असे रामदेव बाबा म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. शिबिरात अनेक अॅलोपॅथी डॉक्टर उपस्थित असून त्यांनी आता आयुर्वेदात रुची निर्माण झाली आहे. एमबीबीएस आणि अॅलोपॅथीचे शिक्षण घेतल्यानंतरही अनेक डॉक्टर आता आयुर्वेदाला पाठिंबा देत आहेत, असे रामदेव बाबा म्हणाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

रामदेव बाबा आणि आयएमए वाद -

रामदेव बाबा नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकतात. त्यानुसार आता त्यांनी अलोपॅथी डॉक्टरांविरोधात आणि कोरोना उपचारपद्धती विरोधात वादग्रस्त विधान करत मोठ्या वादाला सुरुवात केली. अलोपॅथी उपचार पद्धतीमुळेच आज लाखो लोकांचा जीव गेला आहे. अलोपॅथी हे मुर्ख सायन्स आहे. तर दोन लस घेऊनही 10 हजार डॉक्टर आणि एक लाख लोक दगावले आहेत, असे वक्तव्य रामदेव बाबाने केले. या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातुन नाराजी व्यक्त केली जात आहे. आयएमएने तर रामदेव बाबावर थेट देशद्रोहाचा खटला दाखल करत कडक कारवाई करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. तसे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयासह पंतप्रधानांना पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे आयएमएच्या उत्तराखंड शाखेने रामदेव बाबाविरोधात 1 हजार कोटींची दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. त्याचवेळी डॉ लेले यांनी दिल्लीतील एका पोलीस ठाण्यात रामदेव बाबा विरोधात तक्रारही दाखल केली आहे.

हेही वाचा -"...अरेस्ट तो उनका बाप भी नही कर सकता', बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details