मथुरा ( उत्तरप्रदेश ) : जिल्ह्यातील कोसीकला पोलीस स्टेशन हद्दीतील मीना नगर कॉलनीत परस्पर वादातून पत्नीने पतीला पेट्रोल ओतून जाळले. आगीमुळे पती गंभीर जखमी झाला. घटनेनंतर पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारची आहे. पत्नीचे कुणा व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय असल्याचे सांगण्यात येत आहे. ( Wife Burned Husband ) ( wife killed husband ) ( Husband murdered due to illicit relations ) ( murdered in mutual dispute )
कोसीकला पोलिस स्टेशनचे अध्यक्ष अनुज कुमार यांनी सांगितले की, सोमवारी एका महिलेने पेट्रोल ओतून पतीला पेटवून दिले. आगीत जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मंगळवारी दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी मुलाच्या पत्नीने पेट्रोल टाकून जाळल्याची तक्रार मृताच्या नातेवाईकांनी दिली होती. मात्र आता महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.