महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top up home loans : वैयक्तिक कर्जाऐवजी टॉप-अप होम लोन का निवडावे? घ्या जाणून - टॉप अप कर्ज

सध्याच्या गृहकर्ज ग्राहकांना ते योग्य प्रकारे हप्ते भरत असल्यास बँका त्यांना टॉप अप कर्ज देत आहेत. टॉप अपवरील व्याज हे मुख्य गृहकर्जासारखेच असते. तुम्हाला पैशांची गरज असल्यास, टॉप अप लोन घेतले जाऊ शकतात कारण ते वैयक्तिक आणि सुवर्ण कर्जाच्या तुलनेत कमी व्याज आणि जास्त कालावधीसाठी मिळतात.

Home loans
होम लोन का निवडावे

By

Published : Jan 17, 2023, 3:35 PM IST

हैदराबाद :नियमित हप्ते भरणाऱ्या विद्यमान ग्राहकांना बँका चांगल्या ऑफर देत आहेत. जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी गृहकर्ज घेतले असेल तर तुमच्या घराची किंमत आता वाढली असेल. त्याचबरोबर तुमचे उत्पन्नही वाढलेले असते. आता तुमची परतफेड क्षमता लक्षात घेऊन, बँका तुम्हाला तुमच्या सध्याच्या गृहकर्जावर टॉप अप कर्ज देत आहेत.

बँकांची नवीन कर्ज देण्यास धडपड :आजकाल गृहकर्जावरील व्याजदर वाढत आहेत. तो आधीच 8.5 ते 9 टक्क्यांवर पोहोचला आहे. भविष्यात व्याजदर आणखी 35 ते 50 बेसिस पॉइंट्सने वाढू शकतो. या दरम्यान बँका नवीन कर्ज देण्यास तयार आहेत. जे लोक आतापर्यंत शिस्तबद्ध हप्ता भरत आहेत, त्यांना कायम ठेवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. शिवाय, बँका आधीच कर्जदारांना ओळखत असल्याने कोणतीही अडचण येणार नाही.

2 लाख रुपयांपर्यंत कर वजावटपात्र : टॉप अप्सच्या कर्जदारांसाठी गृहकर्ज अंतर्गत सर्व फायदे उपलब्ध होणार नाहीत. आयकर कायद्याच्या कलम 24 नुसार, गृहकर्जावर दिलेले व्याज 2 लाख रुपयांपर्यंत कर वजावटपात्र आहे आणि मुद्दल कलम 80C च्या मर्यादेपर्यंत कर वजावटपात्र आहे. टॉप-अप कर्जामध्ये सहसा ही सुविधा नसते. जेव्हा घराच्या विस्तारासाठी वापर केला जातो तेव्हाच सूट लागू होते. याबाबत पुरेसे पुरावे सादर करावेत लागतात.

टॉप अप होम लोन: जेव्हा तुम्हाला खरोखर पैशांची गरज असते, तेव्हा टॉप अप होम लोन तुम्हाला फायदे देते. वैयक्तिक किंवा सुवर्ण कर्जाच्या तुलनेत जास्त कालावधीसाठी आणि कमी व्याजावर टॉप अप घेतले जाऊ शकते. गृहकर्जाच्या कालावधीनुसार, टॉप-अप कर्जाचा कालावधी देखील निश्चित केला जातो. गृहकर्ज 15 वर्षांसाठी भरायचे असल्यास, टॉप-अप कर्ज देखील 15 वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाते. इतर कर्जांना हा कालावधी मिळत नाही.

किंचित जास्त व्याजदर :वेगवेगळ्या बँका वेगवेगळे नियम ठरवतात. तुम्हाला प्रथम तुमच्या बँकेचे टॉप-अप नियम माहीत असले पाहिजेत. तुम्हाला एकाचवेळी पैशांची गरज नसल्यास, तुम्ही टॉप अप कर्जामध्येच ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकता. गृहकर्जाच्या तुलनेत त्यावर किंचित जास्त व्याजदर आहे. आवश्यक असेल तेव्हाच आणि दीर्घकाळासाठी पैसे उधार घेणे शक्य आहे. वापरलेल्या रकमेवर व्याज आकारले जाते. परिणामी, जास्त भार पडणार नाही.

कमी व्याजाचे कर्ज :सध्याच्या गृहकर्जाच्या बाबतीत, बँकांकडे कर्जदाराची सर्व माहिती आधीच असते. तसेच कर्जाचे हप्ते कसे भरले जात आहेत हे दिसून येते. टॉप अप लोन घेण्यासाठी, कर्जदाराला हप्त्यांच्या योग्य पेमेंटचा तपशील, उत्पन्नाचा पुरावा आणि काही इतर कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे. टॉप-अप कर्जाची रक्कम उत्पन्न, गृहकर्जाची रक्कम, गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे बाजार मूल्य इत्यादींवर अवलंबून असते. सामान्यतः या टॉप-अप कर्जावरील व्याजदर गृहकर्जाच्या व्याजाप्रमाणेच असतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत याला कमी व्याजाचे कर्ज म्हणता येईल. आता काही बँका आणि कर्ज संस्था आगाऊ टॉप अप कर्ज मंजूर करत आहेत. जास्त व्याजाने कर्ज घेण्याऐवजी, जेव्हा तुम्हाला पैशाची गरज असते तेव्हा हे निवडणे चांगले.

हेही वाचा :Union Budget 2023 मी देखील मध्यमवर्गीय आहे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारमण यांची स्पष्टोक्ती

ABOUT THE AUTHOR

...view details