नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून 2000 रुपयांच्या नोटा बाद केल्या आहेत. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा कराव्या लागणार आहेत. ज्यांच्याकडे या नोटा आहेत, ते नागरीक बँक खात्यात जमा करू शकतात किंवा त्या बदल करुन घेऊ शकणार आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा का बंद करण्यात आल्या. या नोटा बंद करायच्या होत्या मग या दोन हजार रुपायांच्या नोटा चलनात का आणल्या गेल्या. ही प्रश्न अनेकांना पडला आहे. याचबरोबर या नोटांचा रक्तरंजीत इतिहास आहे, तो काय आहे हे आपण जाणून घेऊ.
का बंद करण्यात आली 2 हजार रुपयांची नोट : बाजारातून या नोटा हळू-हळू कमी होऊ लागल्या होत्या. त्यामागे कारण म्हणजे या नोटा बंद होणार आहेत. देशात पुन्हा नोटाबंदी केली जाईल,अशा अफवा या दोन हजारांच्या नोटांविषयी उठवल्या जात होत्या. यामुळे या नोटा दुकानदार स्वीकारत नव्हते. ग्राहक सुद्धा या नोटा स्वीकरत नव्हते. ज्या लोकांकडे दोन हजारांची नोट असायची त्याला सुट्ट्या पैशांसाठी खूप समस्या निर्माण होत होती. कारण 500 नंतर थेट 2 हजार रुपयांची नोट असल्यामुळे सुट्टे लवकर मिळत नसतं.
नोटा बंद करण्याचे कारण काय ? :भारताच्या चलनात 31 मार्च 2017 पर्यंत या नोटांच्या एकूण मूल्यामध्ये 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 50.2 टक्के होता. तर 31 मार्च 2022 रोजी चलनात असलेल्या एकूण नोटांच्या मूल्यात 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 13.8 टक्के होता. दरम्यान आरबीआयने 2000 रुपयांची नोट बंद केली नसली तरी ती छापली जात नाही.
छपाई झाली बंद : या नोटांची 2016-2017 या वर्षात मोठी छपाई झाली होती. 35429.91 कोटी इतक्या नोटांची छपाई करण्यात आली होती. तर 2017-18मध्ये 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या होत्या. त्यात 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2019 ते 2022 या काळात एकही नोट छापण्यात आली नाही.