महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Paryushan Parva 2022 जैन धर्मात काय आहे पर्युषण पर्वाचे महत्व, पार्वधिराज म्हणजे काय - Paryushan Parva in Jainism

जैन धर्मातील बांधव Jainism पर्युषण पर्व Paryushan Parva 2022 साजरा करत असतात. जैन धर्मातील काही महत्वपूर्ण धार्मिक उत्सवांमध्ये पर्युषण पर्वाचेही एक वेगळे महत्व importance of Paryushan Parva आहे. पर्युषण पर्वाला जैन समाजातील सर्वात मोठे पर्व मानले जाते आणि त्यामुळे याला पार्वधिराज Parvadhiraj असेही म्हटले जाते. जाणून घेऊया या पर्युषण पर्वाचे काय महत्व आहे ते.

Paryushan Parva 2022
पर्युषण पर्वाचे महत्व

By

Published : Aug 20, 2022, 1:18 PM IST

Updated : Aug 24, 2022, 11:58 AM IST

जैन धर्मातील बांधव Jainism पर्युषण पर्व Paryushan Parva 2022 साजरा करत असतात. जैन धर्मातील काही महत्वपूर्ण धार्मिक उत्सवांमध्ये पर्युषण पर्वाचेही एक वेगळे महत्व importance of Paryushan Parva आहे. जैन समाजाचा सर्वात पवित्र उत्सव म्हणजेच पर्युषण पर्व बुधवार 24 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. पुढील आठ दिवस जैन धर्मातील श्वेतांबर पंथातील बांधव हे पर्युषण पर्व साजरा करतील. तर, दिगंबर समुदायातील जैन बांधव १० दिवसांपर्यंत या पवित्र व्रताचे पालन करतील. पर्युषण पर्व सुरू होण्यापूर्वीच जैन बांधवांनी सर्व मंदिर, धार्मिक स्थळांची साफसफाई पूर्ण केली आहे. पर्युषण पर्वाला जैन समाजातील सर्वात मोठे पर्व मानले जाते आणि त्यामुळे याला पार्वधिराज Parvadhiraj असेही म्हटले जाते.

पर्युषण पर्व म्हणजे कायपर्युषणचा सामान्य अर्थ, मनातील सर्व विकार कमी करणे असा होय. म्हणजेच या उत्सवात आपल्या मनात उद्भवणारे सर्व वाईट विचार दूर करण्याचा उपवास म्हणजे पर्युषण पर्व होय. जैन धर्माचे सर्व बांधव या पर्युषण पर्वाच्या काळात मनातील सर्व विकार क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि वैराग्यापासून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. या सर्व विकारांवर विजय मिळवल्यानंतर त्यांना स्वत:ला शांती आणि शुद्धतेकडे नेण्याचा मार्ग सापडतो. हा उत्सव साजरा करणारे अनुयायी भगवान महावीरांनी सांगितलेल्या १० नियमांचं पालन करुन पर्युषण पर्व साजरा करतात.

विविध व्रतांचे पालनजैन धर्मातील दिगंबर पंथामधील अनुयायी पर्युषण पर्वाच्या काळात १० दिवस विविध व्रतांचे पालन करतात. यासाठी या पर्युषण पर्वाला दशलक्षणा पर्व असेही म्हणतात. त्याचवेळी श्वेतांबर पंथामधील लोक आठ दिवस हा उत्सव साजरा करतात म्हणून या पंथातील अनुयायी अष्टिक म्हणून पर्युषण साजरा करतात.

पाच सिद्धांतांचे पालनपर्युषण पर्वामध्ये जैन धर्माच्या पाच सिद्धांतांचे पालन केले जाते. या पाच सिद्धांतांमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा अधिक धन जमा न करणे यांचा समावेश आहे.

जैन धर्माच्या मुख्य तत्वावर चालण्याचा मार्गहिंदू धर्मातील नवरात्रांप्रमाणेच मानला जाणारा हा उत्सव, जैन धर्माचे मुख्य तत्व अहिंसेवर चालण्याचा मार्ग दर्शवतो. या उत्सवाच्या काळात जैन धर्मिय नागरीक संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतात आणि आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करतात. पावसाळ्यात साजरे होणारे हे पर्युषण पर्व समाजाला निसर्गासोबत जोडण्याचे प्रशिक्षण देतो. या उत्सवात जैन समाजातील बांधव संपूर्ण भक्तीभावाने धार्मिक उपवास करतात. पावसाळ्यातील चार महिन्यात पृथ्वीतलावर सर्वत्र हिरवळ वाढते. या काळात बऱ्याच प्रकारचे प्राणी, सूक्ष्मजीव जन्माला येतात. वाटेत चिखल किंवा पाणी साचल्यामुळे मार्गावर चालता येत नाही. हे सर्व लक्षात घेऊन जैन साध्वींनी या काळात एकाच ठिकाणी राहून देवाची उपासना करण्याची व्यवस्था केली. या काळात प्रवचन, धर्मसाधना, प्रार्थना केल्या जातात.

अहिंसा परमो धर्मःजैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म असून, त्याला हजारो वर्षांची पंरपरा आहे. अहिंसा परमो धर्मः हा या धर्माचा गाभा आहे. जैन धर्म श्वेतांबर आणि दिगंबर या दोन मुख्य पंथांमध्ये विस्तारला आहे. यांच्या परंपरांमध्ये काही लहान-मोठे बदल आढळून येतात. श्वेतांबर जैनांमध्ये तेरापंथी मूर्ती पूजक, डेरावासी आणि स्थानकवासी असे तीन उपपंथ आहेत. यातील तेरापंथी मूर्ती पूजक हे मूर्तीचे पूजन करतात, त्यासाठी जल अभिषेक करतात. डेरावासीदेखील मूर्ती पूजक आहेत. मात्र, ते पंचांमृताचा अभिषेक करतात. स्थानक पंथात मूर्तीपूजन नाही. धार्मिक कार्यक्रम होतात, पण मूर्तीची पूजा होत नाही.

तत्त्वार्थ सूत्र या ग्रंथातील संकल्पना व्यवहार आणि निश्चय. व्यवहार यामध्ये बाह्य जगाशी जुळवून घेत शांततामय आयुष्य जगणे याला महत्त्व दिले गेले आहे.निश्चय यामध्ये आंतरिक समृद्धी वाढविणे आणि स्वतःचा विकास करणे याला महत्त्व दिले गेले आहे.

पर्युषण या शब्दाचा अर्थ आहे मनातील सर्व विकारांचे शमन करणे. काम, क्रोध, लोभ, वैमनस्य या विकारांपासून दूर राहून स्वतःला शांती प्राप्त करून घेणे असे या व्रताचे महत्त्व जैन संप्रदायातील उपासकांसाठी सांगितले आहे. पर्युशमन असेही या व्रताला नाव दिले जाते, कारण यामध्ये मनातील विकारांचे शमन होणे अपेक्षित आहे. या व्रताच्या माध्यमातून साधकाने आध्यात्मिक प्रगती साधावी आणि शांतता प्राप्त करावी असा उद्देश असतो. या व्रताच्या काळात पाच नियमांचे पालन केले जाते. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य ही पाच तत्त्वे पाळली जातात.

पर्युषण पर्वाच्या काळात अनुयायी करता ही प्रमुख कामे

1.पर्युषण पर्वाच्या काळात सर्व भाविक धार्मिक ग्रंथांचे वाचन करतात.

2.धार्मिक प्रवचन ऐकले जातात.

3.पर्युषण पर्वाच्या काळात भाविक उपवासही करतात. पुण्य लाभावे यासाठी दान देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.

4.जैन मंदिरांची साफ सफाई करुन स्वच्छता केली जाते, सजावट केली जाते.

5.पर्युषण पर्वाच्या काळात रथयात्रा किंवा मिरणवणुका काढल्या जातात.

6.या काळात मंदिर किंवा सार्वजनिक ठिकाणी सामुदायिक भोजनाची व्यवस्था केली जाते.

श्वेतांबर आणि दिगंबरजैन संप्रदायात श्वेतांबर आणि दिगंबर अशा दोन शाखा आहेत. त्यांपैकी श्वेतांबरउपासक हे पर्व आठ दिवस पाळतात म्हणून याला अष्टहिक असे म्हटले जाते. बऱ्याचदा अनंत चतुर्दशी या दिवशी या व्रताची सांगता होते. दिगंबर संप्रदायाचे लोक १० दिवस ह्या व्रताचे पालन करतात. भगवान महावीर यांनी केलेल्या दहा उपदेशाचे स्मरण या दिवसात केले जाते. काही साधक या काळात साधुवेश धारण करून एखाद्या पवित्र स्थळी निवास करतात. लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सर्वजण हे व्रत करतात. ज्यांना दहा दिवस उपवास करणे शक्य नसते ते एका दिवसाआड उपवास करतात. पर्वाच्या शेवटच्या म्हणजे अनंत चतुर्दशी या दिवशी सार्वजनिक उपवास असतो. काही कट्टर जैन उपासक या पर्वाच्या तीन दिवस आधी अन्न न घेता केवळ गरम पाणी पितात. पर्वकाळात रोज सकाळी मंदिरात अष्टविधी पूजा असते. तत्त्वार्थसूत्र या ग्रंथातील एक एक अध्याय रोज वाचला जातो. पर्युषण व्रताच्या शेवटच्या दिवशी कल्पसूत्राची मिरवणूक काढली जाते. पाचव्या दिवशी महावीर जयंती साजरी केली जाते.

व्रताच्या अखेरचा दिवसया व्रताच्या अखेरच्या दिवसाला संवत्सरी असे म्हणतात. क्षमा हे वीरांचे भूषण आहे, असे भगवान महावीर यांनी आपल्या उपदेशात सांगितले आहे. त्याला अनुसरून या पर्वाच्या सांगतेत उपासकाने सर्वांची क्षमा मागणे, याला या व्रतात विशेष महात्त्व दिले गेले आहे. क्षमा ही सर्व पापांना दूर करून मोक्षाचा मार्ग दाखविते असा विचार यामागे आहे.

हेही वाचाJanmashtami 2022 ऑनस्क्रीन भगवान कृष्णाची भूमिका करणारी कलाकार, पाहा फोटो

Last Updated : Aug 24, 2022, 11:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details