महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ? जाणून घ्या आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर - Binance Rate Today

क्रिप्टो चलनाच्या किमतीमधील प्रचंड चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांसाठी तीव्र जोखीम असते. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांत कोणती गुंतवणुक सुरक्षित राहील याकडे (Bitcoin Rate Today) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष (Cryptocurrency Prices Today) असते. आज क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय (What is cryptocurrency) तसेच क्रिप्टोकरन्सीचे दर जाणून घेवू या.

Cryptocurrency Prices Today
आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर

By

Published : Jan 9, 2023, 6:35 AM IST

मुंबई :क्रिप्टोकरन्सी, क्रिप्टोचलन, ​​किंवा क्रिप्टो हे एक डिजिटल चलन (What is cryptocurrency) आहे. जे संगणक नेटवर्कद्वारे व्यवहाराचे माध्यम म्हणून काम करण्यासाठी तयार केलेले आहे. हे चलन टिकवून ठेवण्यासाठी किंवा राखण्यासाठी सरकार किंवा बँकेसारख्या कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणावर अवलंबून नाही. क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन आहे. ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते. बिटकॉइनहे विकेंद्रित डिजिटल चलन आहे. हे पहिले विकेंद्रित डिजिटल चलन (Cryptocurrency Prices Today) आहे.

आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर

क्रिप्टोकरन्सी दर :आज बिटकॉइनची किंमत 14,10,877 रूपये (Binance Rate Today) आहे. इथेरिअमची किंमत 1,06,025 रूपये आहे. बायनान्सची किंमत 22,586 रूपये (Bitcoin Rate Today) आहे.

वेगळा मालमत्ता वर्ग : वैयक्तिक नाण्यांच्या मालकीच्या नोंदी डिजिटल लेजरमध्ये संग्रहित केल्या (Ethereum Rate Today) जातात. हा लेजर व्यवहाराच्या नोंदी सुरक्षित करण्यासाठी, अतिरिक्त नाण्यांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नाण्यांच्या मालकीच्या हस्तांतरणाची पडताळणी करण्यासाठी मजबूत क्रिप्टोग्राफी वापरलेला संगणकीकृत डेटाबेस (Cryptocurrency Prices 9 January 2023 ) आहे. क्रिप्टोकरन्सी ही पारंपारिक अर्थाने चलन मानली जात नाही. आणि त्यांना विविध श्रेणीत्मक उपचार लागू केले गेले आहेत, ज्यामध्ये वस्तू, ठेवी, तसेच चलने म्हणून वर्गीकरण समाविष्ट आहे. क्रिप्टोकरन्सी सामान्यतः व्यवहारात एक वेगळा मालमत्ता वर्ग म्हणून पाहिली जाते.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान :आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी सशक्त क्रिप्टोग्राफी वापरते. केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात. हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या साह्याने निर्माण करण्यात आलेले चलन आहे. हे चलन भौतिक नसते. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात. त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. या चलनावर कोणत्याही देशाची किवा कंपनीची मक्तेदारी नाही. या चलनाद्वारे केलेले सर्व व्यवहार ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे केले (Cryptocurrency Prices in India) जातात.

ऑनलाईन उपलब्ध :कोणत्याही देशाचे सरकार वा बँक हे चलन 'छापत' नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. मायनिंगद्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात. जशी जगभरात रुपया, डॉलर,युरो, पाऊंड अशी विविधं चलने आहेत, तशाच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीजही आहेत. बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत. फेसबुकही त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी लाँच करायची तयारी करत (Cryptocurrency Prices Today in India) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details