मेष: आठवड्याची सुरवात काही नवीन उमेदीने होईल. आपण आपल्या व्यक्तिगत जीवनामुळे अत्यंत व्याकुळ व्हाल. वैवाहिक जीवनातील तणाव आपल्या चिंतेस कारणीभूत ठरू शकते. आपणास आपल्या संततीकडून सौख्य मिळाले तरी जोडीदाराशी असलेल्या संबंधात कटुता येऊ शकते. ही कटुता दूर करण्याचा प्रयत्न करावा. प्रेमीजन नात्यातील आनंद अनुभवतील. त्यांच्यातील दुरावा दूर झाल्यानं ते एकमेकांना समजून घेतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. चांगले काम करून ते स्वतःसाठी स्थान निर्माण करू शकतील. त्यांना त्यांच्या वरिष्ठांचा पाठिंबा सुद्धा मिळेल. व्यापाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागेल. त्यांना काहीतरी चांगले करण्याची संधी मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करू शकतील. त्यांची एकाग्रता सुद्धा वृद्धिंगत होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. आरोग्याची काळजी घ्यावी.
वृषभ : हा आठवडा मानसिक ताण वाढविणारा असू शकतो. सुरवातीस आपण खूपच तणावग्रस्त असाल. ह्या तणावातून बाहेर पडण्यास आठवड्याचा मध्य उगवेल. प्राप्ती सामान्यच असल्याने आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास सर्व काही सुरळीत होईल. अन्यथा समस्या वाढतील. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवेल. जोडीदाराशी मतभेद झाल्यामुळे समस्या संभवतात, परंतु थोडा धीर धरा. येणारा काळ चांगला असेल. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या नात्यात प्रगती साधण्यासाठी आपणास थोडी हिंमत दाखवावी लागेल. तसेच आपल्या प्रेमिके समोर प्रेमाची कबुली द्यावी लागेल. ह्यासाठी आवश्यकता भासल्यास आपण एखाद्या मित्राची मदत सुद्धा घेऊ शकता. आपली प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. विनाकारण आपला पैसा कोणाला देऊ नये. दिल्यास तो परत मिळण्याची अपेक्षा मनी बाळगू नये. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांना खूप धावपळ करावी लागेल. हा आठवडा व्यापारात खूप मोठी तेजी घेऊन येईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यशस्वी होण्याची संधी आहे.
मिथुन :हा आठवडा आपणास पुढे जाण्यास प्रेरित करेल. परंतु आपल्या मार्गात बरीच आव्हाने येत असल्याने आपला मार्ग अडवला जाईल. मात्र, आपण न खचता त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. प्राप्तीत खूप मोठी वाढ झाल्याने आपला आत्मविश्वास उंचावेल. असे असले तरी आपणास प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत परिस्थिती आपणास अनुकूल राहील. फक्त आपल्या वरिष्ठांशी हुज्जत घालत बसू नका. हा आठवडा व्यापारास अनुकूल आहे. गुंतवणुकीतून लाभ होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होईल. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळविण्यात यशस्वी होऊ शकाल. घरगुती वातावरण सुखावह राहील. मित्रांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपल्या प्रेमिकेची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासावर अतिरिक्त लक्ष देण्याची गरज भासेल.
कर्क :हा आठवडा आपल्यासाठी चांगली बातमी घेऊन येणारा आहे. आपल्या कार्यक्षेत्रात बदल होण्याची संभावना आहे. कदाचित आपण नोकरी बदलाल किंवा सध्याच्या नोकरीत आपली बदली होऊ शकते, तेव्हा तयार राहावे. कामा निमित्त धावपळ वाढेल. कुटुंबियांना वेळ कमी दिल्याने कुटुंबात तणाव वाढू शकतो. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप संभवतात, तेव्हा सावध राहावे. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या अनेक योजना ज्या मंदावल्या होत्या त्या आता पूर्णत्वास जातील. त्यांचा आपणास फायदा होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या मेहनतीच्या जोरावर चांगली कामगिरी करतील, परंतु काही समस्या त्यांना त्रस्त करू शकतात. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. जोडीदाराशी समन्वयात सुधारणा होईल. प्रेमीजनांसाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. त्यांना आपल्या कुटुंबीयांची परवानगी घेऊनच नात्यात पुढे जावे लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीस दुसरा पर्याय नाही.
सिंह : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात असू शकता. ह्यात आपला खर्च सुद्धा जास्त होईल. असे असले तरी आपणास काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. हीच लोक भविष्यात आपल्या उपयोगी पडतील. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती उत्तम असेल. आपली मेहनत यशस्वी होईल. व्यापाऱ्यांना काही नवीन व वेगळा विचार करावा लागेल. असे केल्यासच ते त्यांच्या व्यापारात प्रगती करू शकतील. त्यावरच त्यांचा फायदा अवलंबून राहील. ह्या आठवड्यात आपली प्राप्ती सामान्यच राहील. आरोग्य सुद्धा सामान्यच राहील. विवाहितांना त्यांचे वैवाहिक जीवन अधिक सुखद करण्यासाठी आपल्या पूर्वीच्या चुका स्वीकारून जोडीदाराशी संवाद साधावा लागेल. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपले नाते दृढ असल्याचे आपणास जाणवेल. आठवड्याची सुरवात प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात त्रास होईल. त्यासाठी त्यांना एखाद्या मार्गदर्शकाची गरज सुद्धा भासेल.
कन्या : आठवड्याची सुरवात प्रतिकूल नसली तरी आपण एखाद्या गोष्टीने खूप तणावग्रस्त असू शकता व त्यामुळे आपली प्रकृती सुद्धा बिघडू शकते. ह्या सर्वातून बाहेर पडण्यासाठी आपणास संधी व आत्मविश्वास असे दोन्ही प्राप्त होतील. व्यापाऱ्यांसाठी हे सर्व काहीसे आव्हानात्मक असू शकते. आपणास काही नवीन कामांवर लक्ष देण्याची गरज सुद्धा भासू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपले प्रयत्न व काम करण्याची गती उत्तम असल्याने नोकरीत आपली स्थिती उंचावल्याचे आपणास जाणवेल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील तणावातून बऱ्याच प्रमाणात बाहेर पडल्याचे दिसून येईल. जोडीदाराशी आपले तसेच आपल्या कुटुंबियांशी सासुरवाडीचे असे दोन्ही कुटुंबियां दरम्यान सामंजस्य वाढविण्याच्या दिशेने आपण प्रयत्नशील असल्याचे दिसून येईल. प्रणयी जीवन सामान्य राहील. आपण आपल्या प्रेमिकेसाठी काही करण्याची योजना आखू शकता. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यशस्वी होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांनी मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून खूप मेहनत करावी.