मेष : या आठवड्यात आपणास नशिबाची साथ मिळेल. एखादे मोठे काम होण्याची संभावना आहे. आपण ईश्वरास शरण गेल्यामुळे आपणास मानसिक शांतता लाभेल. कामात यश प्राप्त होईल. नशीब बलवान होईल. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती चांगली होईल. आपणास आपल्या प्रयत्नांचे सुखद परिणाम पाहावयास मिळतील. असे असले तरी अति आत्मविश्वासाने काम करू नये, अन्यथा त्रास होऊ शकतो. व्यापारात उत्तम यश संभवते. आपले परिश्रम आपणास पुढे घेऊन जातील. बाजारात आपणास चांगली प्रसिद्धी मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव बहुतांशी दूर होतील. एकमेकांना समजून घेतल्याने आपल्यातील जवळीक वाढेल व जीवनाप्रती आपली जवाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण कराल. प्रणयी जीवनातील समस्या कमी होतील. गैरसमज दूर होऊन एकमेकांशी जवळीक वाढेल. विद्यार्थी अभ्यासात मग्न राहतील. ते खूप मेहनत करतील. त्यांच्या परिश्रमाचे यथोचित फळ त्यांना प्राप्त होऊन अभ्यासात चांगले परिणाम सुद्धा मिळतील. आठवड्याचा सुरूवातीचा दिवस प्रवासासाठी अनुकूल आहे. या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विरोधकांवर आपण मात करू शकाल. कोर्ट - कचेरीच्या कामात आपण यशस्वी व्हाल.
वृषभ : आठवड्याची सुरूवात आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. एखाद्या गोष्टीने आपण अत्यंत चिंतीत झाल्यामुळे आपली प्रकृती बिघडू शकते. तेव्हा सावध राहावे. आठवड्याचे मधले दिवस उत्तम आहेत. नोकरी करणाऱ्यांना आत्मसन्मानाने काम करण्यात यश प्राप्त होईल. असे असले तरी आपला अहंकार सोडून द्यावा, अन्यथा त्रास संभवतो. वरिष्ठांशी आपले संबंध बिघडू शकतात. तेव्हा सतर्क राहा. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे. त्यांच्या व्यापाराची वृद्धी होऊन प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. हा आठवडा आपली आर्थिक प्रगती करणारा आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा प्रतिकूल आहे. भांडण टाळण्याचा प्रयत्न करावा. अभ्यासासाठी अनेक विकल्प विद्यार्थ्यांच्या दृष्टीपथास येतील, तेव्हा अभ्यासावर जास्त लक्ष द्यावे. अन्यथा प्रतिकूल परिणाम मिळण्याची संभावना आहे.
मिथुन: हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी काही नवीन सौदे घेऊन येण्याची संभावना आहे. आपणास लोकांशी संवाद साधण्याची संधी मळेल. आपण जर भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आपण उत्तम स्थितीत याल व आपला व्यापारात प्रगती होईल. व्यापारातील प्रगतीने आपण खुश व्हाल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामावर लक्ष द्यावे लागेल. नशिबाची साथ मिळाल्याने बरीचशी कामे सहजपणे होतील. प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसेल. आठवड्याचा पहिला दिवस व अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सामान्यच आहे. त्यांनी फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. गरज भासल्यास अभ्यासासाठी ते मित्रांची मदत घेऊ शकतात. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात काही नवीन करण्याची तयारी करतील. ते आपल्या जोडीदारास आश्चर्यचकित करू शकतात. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे.
कर्क : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण निव्वळ आपल्या मेहनतीनेच नव्हे तर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपली कामे वेळेवर पूर्ण कराल. त्यामुळे आपल्यात उत्तम समन्वय साधला जाईल. ते आपल्या पाठीशी असल्याचे दिसून येईल. नोकरीत आपण मजबूत स्थितीत असाल. व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. काही चुका आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात. तेव्हा सावध राहावे. ह्या आठवड्यात आपली प्राप्ती काहीशी कमी होईल. कौटुंबिक जीवनात काही समानता दिसून येईल. कुटुंबीयात समन्वयाचा काहीसा अभाव असल्याचे जाणवेल. त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वैवाहिक जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आपण बाहेर फिरण्यास किंवा जोडीदारासह खरेदी करण्यास जाऊ शकाल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेसाठी काहीही करण्यास तयार राहाल. तिच्यासाठी चांगल्यात चांगली भेटवस्तू सुद्धा घेऊन याल. तिच्यासह फिरण्यासाठी आठवडा चांगला आहे. विद्यार्थ्यांना त्यांची तीव्र बुद्धिमत्ता अभ्यासात मदतरूप ठरेल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
सिंह: हा आठवडा आपणास अनुकूल आहे. मनात प्रेमाचे नवनवीन फुले उमलतील व त्यामुळे आपण आपले प्रणयी जीवन अधिक सुखावह करू शकाल. आपल्या मनातील भावना सर्जनात्मक पद्धतीने आपल्या प्रेमिके समोर व्यक्त करू शकाल. त्यामुळे तिच्या चेहेऱ्यावर सुद्धा आनंद पसरेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन काहीसे तणावग्रस्त असू शकते. असे असून सुद्धा आपण आपल्या स्वभावामुळे जोडीदारास खुश करू शकाल. त्यामुळे नात्यात सुधारणा होईल. असे झाल्याने आपला वेळ मजेत जाईल. आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. काही हलके फुलके पदार्थ खावेत की, ज्यामुळे आपणास फायदा होऊ शकेल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल असला तरी सरकारी कर वेळेवर भरावा. चोरी करू नका. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपण आपल्या कामासाठी दुसऱ्या ठिकाणी बदली घेऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. ते आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात यशस्वी होतील. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे.
कन्या : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपली प्रॉपर्टीची इच्छा पूर्ण होईल. दीर्घ कालावधी पासून जो सौदा करू इच्छित होता तो ह्या आठवड्यात पूर्णत्वास गेल्याने आपणास फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपल्या हाती एखादी मोठी प्रॉपर्टी लागू शकते. प्रॉपर्टीशी संबंधित सौदा सुद्धा पूर्ण होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात थोडी शांतता राहू शकते. खर्चात वाढ होईल. परंतु, खर्चां सहित एखादी मोठी गुंतवणूक करण्याची योजना सुद्धा केल्याने आगामी कालखंडात आपणास लाभ होईल. विरोधकांवर आपण मात कराल. नोकरीच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. त्याचा आपणास आनंद होईल. व्यापारातील स्थितीत हळूहळू सुधारणा होऊ लागेल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात स्वतःच्या रागास बळी पडू शकतात. तेव्हा सावध राहावे. विनाकारण रागावू नका. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. ह्या अनुकूलतेचा लाभ घ्यावा. आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावत असताना गरज भासल्यास आपल्या प्रेमिकेस मदत करा. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिश्रमांचा फायदा होईल.