महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा येणारा आठवडा? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य - साप्ताहिक राशीभविष्य

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य

By

Published : Aug 19, 2023, 10:23 PM IST

मेष: आठवड्याच्या सुरवातीस आपला वैवाहिक जोडीदार आजारी पडण्याच्या शक्यतेमुळे आपण काहीसे चिंतीत होण्याची संभावना आहे. ते मनाने खूप हळवे झाले असल्याने त्यांना एखाद्या मानसोपचार करणाऱ्या व्यक्तीच्या सल्ल्याची गरज सुद्धा भासेल. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती चांगली असेल. कामात यश प्राप्ती होईल. तसेच आपल्यावर ज्या कामांची जवाबदारी सोपविण्यात येईल ती कामे वेळेवर पूर्ण होतील. त्यामुळे आपण खुश व्हाल. व्यापारात चढ - उतार येतील. ते पार करण्यासाठी आपणास खूप परिश्रम करावे लागतील. घरातील वातावरण आनंदमय राहील. घरात काही सोयी करण्यासाठी आपण घरगुती खर्चांवर लक्ष द्याल. काही नवीन व आवश्यक सामानाची खरेदी संभवते. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी अनुकूल आहे. आपल्या प्रेमिकेची बुद्धिमत्ता पाहून आपण खूप खुश व्हाल. आपण तिला एखादी सुंदरशी भेटवस्तू सुद्धा देऊ शकता. आपला वैवाहिक जोडीदार कुटुंबासाठी एखादा मोठा सल्ला देईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांची बुद्धी विकसित होईल. अभ्यास करणे सोपे होईल. आठवड्याचा पहिला दिवस व अखेरचे तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभ: हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपली आर्थिक स्थिती उंचावण्यास ह्या आठवड्याचे मोठे योगदान राहील. आठवड्याच्या सुरवातीसच आपल्याला एखादी संधी मिळेल, कि ज्यामुळे आपल्या प्राप्तीत जलदगतीने वाढ होऊ लागेल. हा आठवडा व्यापारासाठी खूपच चांगला आहे. आपला व्यावसायिक भागीदार सुद्धा आपल्याशी उत्तम समन्वय साधून चांगली कामगिरी करून दाखवेल. असे झाल्याने आपल्या प्राप्तीत वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. जे विद्यार्थी तांत्रिक किंवा मॅनेजमेंट विषयांचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी आठवडा अत्यंत अनुकूल आहे. इतर विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. फक्त वादापासून दूर राहावे. वैवाहिक जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपला वैवाहिक जोडीदार आपल्यासाठी प्राप्तीत वाढ करण्यासाठी एखादे माध्यम होऊ शकेल. आपल्या दोघातील प्रेम वृद्धिंगत होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. आपल्याला घाई झालेली असेल व आपले म्हणणे पटवून देण्यासाठी प्रेमिकेवर दबाव टाकाल व त्यामुळे वाद होण्याची संभावना आहे. असे असून सुद्धा आपल्यातील प्रेम टिकून राहील. मित्रांशी सलोखा राहील. आठवड्याचा सुरवातीचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. प्रकृतीत सुद्धा थोडी सुधारणा होईल.

मिथुन: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत आपणास यश प्राप्ती होईल. एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करण्यात यशस्वी होऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल असला तरी त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. असे न केल्यास विनाकारण वाद वाढून आपणास नोकरीत अडचणी येऊ शकतात. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी प्राप्तीचे काही नवीन स्रोत घेऊन येईल. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारास गती येईल. व्यावसायिक भागीदारीत सुद्धा सुधारणा होईल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदार कौटुंबिक जवाबदाऱ्या पूर्ण करण्यात सुद्धा आपणास मदत करेल. तसेच आपणास पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चढ - उतारांचा असल्याने सावध राहावे. आपल्या मित्रांची मदत घेऊ शकता. आठवड्याचे सुरवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

कर्क: हा आठवडा आपल्यासाठी काही नवीन परिणाम घेऊन येणारा आहे. आपली कार्यक्षमता व जोखीम घेण्याची क्षमता दोन्ही वाढतील. आपला आत्मविश्वास सुद्धा उंचावेल. असे झाल्यामुळे व्यापारात आपण काही नवीन प्रयत्न करून त्या प्रति अत्यंत आशावादी राहाल. नोकरीसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपणास आपल्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळाल्याने आपण आपली सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. आपल्या कामगिरीत सुधारणा होईल. ह्या आठवड्यात आपण खुश असल्याचे दिसून येईल. तसेच जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात रोमांस तर वाढेलच परंतु जोडीदाराशी संवाद साधून आपणास हे समजेल कि जोडीदार आपल्या प्रति खूपच समर्पित आहे. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी सुद्धा अनुकूल आहे. आपल्या प्रति प्रेमिकेची भावना काय आहे ते आपणास समजेल. आपला एखादा मित्र आपले प्रणयी जीवन अधिक सुखावह करण्यासाठी आपणास मदत करेल. आठवड्याच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एखाद्या मार्गदर्शकाची गरज भासेल. ह्या आठवड्यात आपणास ताप येण्याची संभावना असल्याने काळजी घ्यावी.

सिंह : ह्या आठवड्यात आपणास प्रॉपर्टीतील गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीतून सुद्धा आपणास लाभ होईल. आपली प्रकृती सुद्धा उत्तम राहील. आपण तंदुरुस्तीवर लक्ष देऊन सकाळच्या व्यायामास आपल्या जीवनशैलीत सुद्धा समाविष्ट कराल. खर्चात वाढ होईल. आपण स्वतःच्या आनंदासाठी हा खर्च कराल. काही नवीन सामानांची खरेदी करू शकता. विवाहित व्यक्तींनी आपल्या वैवाहिक जीवनात अहंकार बाजूस सारल्यास फायदा होईल, अन्यथा विनाकारण भांडण - तंट्यातच वेळ वाया जाईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. ह्या दरम्यान आपल्यातील जवळीक वाढेल. आपण आपल्या मनातील भावना प्रेमिके समोर व्यक्त करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत व्यस्त राहण्याचा आहे. आपणास कामा निमित्त भरपूर प्रवास करावे लागतील व त्यामुळे आपणास थकवा सुद्धा जाणवू शकेल. व्यापाऱ्यांनी सरकारी निविदेसाठी अर्ज करावा. मात्र, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याशी संभाव्य वाद टाळावे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आठवड्याचे सुरवातीचे चार दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कन्या: हा आठवडा आपणास खूप फायदा देणारा आहे. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत आपणास यश प्राप्त होईल. आपण एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करूशकता. आपल्या मनात क्रोधा व्यतिरिक्त काहीसा मानसिक तणाव उत्पन्न होऊ शकतो. त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. हळू हळू खर्चांवर नियंत्रण येऊ लागेल. प्राप्तीत वाढ होईल व त्यामुळे आपण आनंदित व्हाल. पैसा उपलब्ध झाल्याने आपण आपले सर्व प्रयत्न सुद्धा पूर्ण करू शकाल. आपणास एखाद्या महिला मित्राचे सहकार्य मिळेल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. आपल्या योजना यशस्वी होतील. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपणास आपल्या कामात जो सुस्तपणा जाणवत होता तो आता दूर होईल व आपली कामे जलद गतीने होऊ लागतील. विवाहित व्यक्ती हळू हळू आपल्या वैवाहिक जीवनातील चिंतेतून बाहेर पडून काहीतरी नव्याचा विचार करू लागतील. आपल्या नात्यात नावीन्य निर्माण करण्यासाठी एक - दोन दिवस एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. प्रणयी जीवनासाठी आठवडा रोमँटिक आहे. आपण पूर्णतः प्रेमात हरवून जाल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे. प्रवासातून आपणास लाभ सुद्धा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासा व्यतिरिक्त इतर प्रवृत्तींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल व त्यामुळे हा आठवडा आपणास अनुकूल असल्याचे त्यांना जाणवेल.

तूळ : हा आठवडा आपले खर्च वाढविणारा आहे. मानसिक तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करून आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा प्रकृती बिघडू शकते. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. जोडीदारासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न आपण कराल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. असे असले तरी आपल्यातील क्रोध नात्यास प्रभावित करू शकतो. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या योजना पुढे रेटू शकता. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून खूप परिश्रम करतील. त्याचे सकारात्मक परिणाम त्यांना मिळत असल्याचे दिसून येईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिक :हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या प्राप्तीत अचानकपणे वाढ झाल्याने आपल्या सर्व चिंता दूर होतील. त्यामुळे आपल्या समोरील आर्थिक आव्हाने कमी होतील. असे असले तरी आपले खर्च होतच राहतील. परंतु प्राप्ती चांगली झाल्याने आपणास काही फरक पडणार नाही. आपण जर आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित केलेत तर अजून चांगले परिणाम मिळू शकतील. प्रकृतीत बिघाड होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपणास पोटाचे विकार त्रस्त करतील. तेव्हा आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या कामात यशस्वी होतील. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा यशस्वी होण्याचा आहे. ते आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. तसेच चांगली अर्थप्राप्ती करू शकतील. व्यापारात चांगला लाभ होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन खुलून उठेल. ते एकमेकांना आपले प्रेम व्यक्त करू शकतील. प्रेमीजनांसाठी आठवडा मिश्र फलदायी आहे. छोटे छोटे वाद संभवत असले तरी आपल्यात रोमांस सुद्धा होईल व त्यामुळे असे आंबट गोड क्षण आपल्या नात्यास अधिक सुखावह करतील. आठवड्याचा पहिला व अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे.

धनु : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्रॉपर्टीच्या बाबतीत यश प्राप्त होईल. अर्थात जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत आपले लक्ष आकर्षित होईल. आपण एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. प्रकृतीत सुधारणा होईल. आपण काही खर्च गुप्त स्वरूपात कराल. सुखसोयींवर लक्ष राहील. नोकरीतील स्थिती मजबूत राहील. आपली पदोन्नती संभवते. आपल्या अधिकारात सुद्धा वाढ होईल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. वडिलांशी संबंधात कटुता येऊ शकते. तेव्हा काळजी घ्यावी. व्यापारात चांगली वाढ होत असल्याचे दिसून येईल. आपले प्रयत्न यशस्वी होतील. आपला आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगतील. प्रेमीजनांना आपल्या मनातील भावना प्रेमिके समोर व्यक्त करण्यास थोडा अवधी लागू शकतो. एकमेकांना भेटण्यात अडचण येऊ शकते. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे. संततीसाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे.

मकर :हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण जमीन - जुमल्याशी संबंधित बाबी हाती घेऊन त्यात यशस्वी सुद्धा व्हाल. घर भाडयाने देऊन सुद्धा आपण चांगली अर्थप्राप्ती करू शकता. नोकरीत हळू हळू आपली स्थिती मजबूत होऊ लागेल. आपले परिश्रम यशस्वी होतील. व्यापाऱ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाल्याने व्यापारास मजबुती येईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन रोमँटिक होईल. एकमेकांप्रती प्रेम सुद्धा राहील. त्यामुळे जीवन सुखावह होऊन वाटचाल करेल. विवाहबाह्य संबंध टाळा, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रणयी जीवनासाठी आठवडा खूपच चांगला आहे. आपणास प्रेमिके समोर व्यक्त होऊन तिला आपलीशी करण्याची संधी मिळेल. आपला विवाह सुद्धा ठरू शकतो. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश प्राप्ती होईल.

कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. आठवड्याची सुरवात काहीशी प्रतिकूल असेल. विनाकारण काही खर्च संभवतात. मानसिक ताण वाढू शकतो. असे असले तरी आठवड्याचे मधले दिवस अनुकूल आहेत. परंतु, हा संपूर्ण आठवडा आपण काहीना काही कारणाने चिंतातुरच असाल. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. मानसिक तणावामुळे आपली प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. आपणास रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. आपल्या नोकरीवर गदा येणार नाही याची काळजी घ्यावी. परिश्रम करा व कामावर लक्ष केंद्रित करा. व्यापाऱ्यांसाठी आठवडा यश प्राप्तीचा आहे. आपल्या योजना फलद्रुप होऊन आपणास त्यांचा लाभ होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन काहीसे प्रतिकूल असू शकते. ह्या दरम्यान आपण व आपला जोडीदार ह्यात वाद संभवतात. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्यच आहे. आपल्या नात्यात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीस हस्तक्षेप करू देऊ नका, अन्यथा आपल्या प्रणयी जीवनात कटुता येऊ शकते. आठवड्याचा मधला व अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम करावे लागतील.

मीन : हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपण वेळापत्रक बनवून आपल्या मित्रांसह अभ्यास करण्यास चांगला वेळ देऊ शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन ह्या आठवड्यात चांगले राहील. जोडीदार आपल्याशी आपल्या फायद्याच्या गोष्टी करेल. त्यात आपल्या दोघांचा फायदा होऊन प्राप्ती सुद्धा वाढेल. खर्चात वाढ होईल. आपल्या सुखासाठी काही नवीन वस्तूंची खरेदी करू शकाल. घरात इन्व्हर्टर किंवा धुलाई मशीन इत्यादी वस्तू खरेदी करून आणू शकता. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना चांगले परिणाम मिळतील. त्यांच्या नात्यातील जवळीक वाढून एकमेकांना चांगले समजून घेऊ शकतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. त्यांना अनुकूलता प्राप्त होईल. प्राप्तीत सुद्धा वाढ होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details