मेष: ह्या आठवड्याच्या सुरवातीस आपणास एखादी आनंददायी बातमी मिळेल. कुटुंबात काही आनंदाचे क्षण येतील, जे सर्वजण एकत्रितपणे साजरे करतील. एखाद्या दूरवरच्या ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चढ - उतारांचा आहे. कामाच्या निमित्ताने व्यस्तता वाढेल. त्यासाठी आपणास प्रवास सुद्धा करावा लागू शकतो. व्यापाऱ्यांना अचानकपणे मोठा लाभ होण्याची संभावना आहे, ज्याची गुंतवणूक करून आपण व्यापारवृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. असे असले तरी आपल्या व्यावसायिक भागीदाराशी मतभेद होण्याची संभावना असल्याने सावध राहावे. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदाराच्या वागणुकीतील बदलामुळे त्रस्त होण्याची संभावना आहे. आपला जोडीदार क्रोधीत होऊन आपणास काहीही बोलण्याची शक्यता आहे. असे बोलणे आपणास रुचणार नाही. प्रणयी जीवन प्रेम व रोमांसयुक्त असेल. आपल्यातील जवळीक नाते अधिक दृढ करेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. ते अभ्यासा बरोबरच दंगामस्ती सुद्धा करतील. असे असले तरी त्यांना शिकण्याची इच्छा झाल्याने ते अभ्यासात चांगले परिणाम मिळवू शकतील. आठवड्याचे सुरवातीचे तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
वृषभ : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. आपण आपल्या मित्रांच्या सहवासात मौजमजा करत असल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या सुरवातीस एखादा छोटासा प्रवास संभवतो. हा प्रवास आपणास तजेला देईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घराच्या सुशोभीकरणासाठी आपण खूप प्रयत्न व खर्च सुद्धा कराल. कौटुंबिक खर्चांवर बराच पैसा खर्च होऊन सुद्धा आपण खुश व्हाल. आपण सढळहस्ते खर्च कराल. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती मजबूत होईल. आपणास आपल्या परिश्रमाचे यथोचित फळ मिळेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. आपले काही विरोधक आपणास त्रास देण्याचा प्रयत्न करतील. आपण मात्र त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडाल. असे असले तरी काही काळासाठी आपणास मानसिक त्रास नक्कीच होईल. वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा काहीसा तणावग्रस्त असेल. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची संभावना असून त्याचा प्रभाव आपल्या संबंधांवर होऊ शकतो, तेव्हा सावध राहावे. प्रणयी जीवनातील गैरसमज व भांडण दूर होऊन संबंधात सुधारणा होईल. मात्र त्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढल्याने त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. प्रकृतीत चढ - उतार होतच राहतील.
मिथुन : हा आठवडा आपणास कौटुंबिक आनंद मिळवून देणारा आहे. कुटुंबियांच्या सहकार्यामुळे कौटुंबिक स्थितीत सुधारणा होऊन एकमेकातील प्रेम वृद्धिंगत झाल्याचे दिसून येईल. मित्रांचे सुद्धा उत्तम सहकार्य आपणास मिळेल. एखाद्या विशिष्ट मित्रास आपण झुकते माप देण्याची संभावना आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. वाद होण्याची संभावना आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव असू शकतो, परंतु जोडीदारास एखादा मोठा लाभ संभवतो. हा आठवडा व्यापारास अनुकूल आहे. व्यापारी यशस्वी होतील. नोकरीच्या ठिकाणी काही त्रास संभवतो. प्रकृतीत चढ - उतार येतील. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याच्या सुरवातीपासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही त्रास होण्याची संभावना आहे. त्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
कर्क : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण अत्यंत भावनाशील झाल्याने एखाद्या व्यक्तीच्या आठवणीने आपणास रडू सुद्धा कोसळू शकते. हा आठवडा व्यक्तिगत जीवनास अनुकूल आहे. वैवाहिक जोडीदाराप्रती भावुक होऊन त्यांच्या प्रती सहानुभूती दर्शवाल. जोडीदाराचे म्हणणे ऐकून आपले प्रेम वाढीस लागेल व त्यांना कौटुंबिक जवाबदाऱ्या पूर्ण करण्यात आपण सहकार्य कराल. आपल्या मातेची प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने त्यांची काळजी घ्यावी. आपणास भावंडांचे सहकार्य मिळेल. आपल्याला प्राप्ती सुद्धा उत्तम होईल. घरात स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती मजबूत होईल. हा आठवडा व्यापारासाठी सुद्धा अनुकूल आहे. परिश्रम करत राहा, निश्चितच यश मिळेल. आपला आत्मविश्वास उंचावल्याचा आपणास फायदा होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रेमिकेसाठी एखादी नवीन योजना आखून तिचे आपल्या जीवनातील महत्व तिला पटवून द्याल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमात मदतरूप होईल अशा एखाद्या व्यक्तीच्या मदतीची आवश्यकता भासेल.
सिंह :ह्या आठवड्याची सुरवात काहीशी प्रतिकूल असू शकते. एखाद्या गोष्टीने आपण तणावग्रस्त व्हाल व त्याचा परिणाम आपल्या प्रकृतीवर सुद्धा होऊ शकतो. तेव्हा काळजी घ्यावी. आपली प्रकृती बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नये. हा आठवडा प्रवासास अनुकूल नसला तरी सुद्धा जर प्रवास जरुरीचा असल्यास आठवड्याच्या शेवटी तो करावा. आपले सहकारी आपणास पूर्णतः सहकार्य करण्याच्या मनःस्थितीत असतील व त्याचा आपणास फायदा होईल. ह्या आठवड्यात खेळाडूंची कामगिरी उंचावू शकते. आपली बँकेतील शिल्लक वाढीस लागेल. प्राप्तीत सुधारणा होईल. किरकोळ खर्च होतील. वैवाहिक जीवनात प्रेम व रोमांस भरपूर असल्याचे दिसून येईल. नात्यातील सर्व गैरसमज दूर झाल्याने आपल्यातील जवळीक वाढेल व त्यामुळे घरातील वातावरण आनंदमय होईल. तसेच आपल्या सभोवतालची लोक सुद्धा खुश झाल्याचे दिसून येईल. मित्रांचे सुद्धा सहकार्य मिळेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या मनातील विचार प्रेमिकेस सांगू शकाल. प्रेम व्यक्त करण्यात कोणतीही अडचण नसल्याचे लक्षात ठेवावे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपली कामे मजबुतीने करतील. आपली निष्ठा व कार्यकौशल्य आपल्या प्रगतीस पोषक ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आठवड्याच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंतचे दिवस अनुकूल आहेत. ह्या दरम्यान आपल्या मनाप्रमाणे अभ्यास करण्याचा आनंद ते घेऊ शकतील. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कन्या : हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. आपण मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येईल. आपले प्रयत्न यशस्वी होतील. प्राप्तीत वृद्धी होईल. आठवड्याच्या सुरवातीस आपणास एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे. आपणास नव्याने काही खर्च करावा लागू शकतो. आपण एखादा मोठा मोबाईल टॅबलेट किंवा कपड्यांची खरेदी करण्यात वेळ व पैसा खर्च करू शकता. आपल्या वैचारिक व ग्रहण शक्तीत बदल होईल. आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येक काम पूर्णत्वास न्याल व त्यामुळे व्यापारात यशस्वी व्हाल. आपल्या व्यवसायास जी मरगळ आली होती ती आता दूर होईल. असे असले तरी कटू बोलण्याने नुकसान होत असते हि गोष्ट लक्षात ठेवावी. आपल्या जेवणाच्या वेळा सांभाळा. वेळेवर भोजन करणे महत्वाचे असते. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. ते जोडीदाराशी उत्तम समन्वय साधू शकतील. आपसातील जवळीक वाढेल. प्रणयी जीवनात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आपण आपल्या प्रेमिकेस फिरावयास जाण्या विषयी सांगू शकाल. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रचित्त असण्याची गरज भासेल.