सिरोही : ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने आयोजित जल जन अभियानाचा शुभारंत्र सुप्रसिद्ध अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या हस्ते अबुरोड येथे करण्यात आला. यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी देशात पाण्याचा प्रश्न गंभीर आहेच. मात्र वाढत्या लोखसंख्येचा प्रश्न त्याहूनही गंभीर असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्रातही पाण्याची समस्या असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जल जमीन सीमीत आहे : अबुरोड येथे ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने जल जन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अभिनेते नाना पाटेकर यांनी या अभियानाचा शुभारंभ करत अभियानाला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. अगोदर आपली लोकसंख्या 35 कोटी होती, आता ती 135 कोटी आहे. आपल्याकडे जल आणि जमीन सीमीत आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येला रोखणे गरजेचे आहे. वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलली जाणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे खाण्याचे वांदे :अभिनेते नाना पाटेकर यांनी जल जन अभियानाचा शुभारंभ करताना महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांच्या अडचणींवरही भाष्य केले. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटूबियांचे खाण्याचे वांदे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांच्या खाण्याची व्यवस्था केली पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्रातही पाण्याची खूप मोठी समस्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रकृतीने नेहमीच सारे काही दिले आहे. मात्र आम्ही त्याचा योग्य उपयोग करू शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.