दिल्ली/मुंबई/बंगळुरू/चंदीगढ - राज्यसभा निवडणुकीसाठी ( rajya sabha election ) आज सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. महाराष्ट्र ( Maharashtra ), हरियाणा, कर्नाटक आणि राजस्थानमधील 16 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज त्या त्या राज्यातील आमदार आपल्या मतदानाद्वारे ( Voting ) करणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांची निवड केली असून या संपूर्ण निवडणुकीचे व्हिडिओ चित्रिकरण केले जात आहे. ज्या प्रमुख उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज होणार आहे त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण, पियुष गोयल, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, मुकुल वासनिक, शिवनेचे संजय राऊत यांचा समावेश आहे. हे सर्व उमेदवार सहज विजयी होतील, असे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली होती. त्यामध्ये 57 उमेदवार बिनविरोध निवडून आले. तथापि, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 16 जागांसाठी मतदान होत आहे.
आतापर्यंत बिनविरोध विजयी झालेल्यांपैकी १४ भाजपचे आहेत. पी चिदंबरम यांच्यासह काँग्रेसचे चार उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशात चार जागा जिंकल्या आहेत. तामिळनाडूत द्रमुक आणि ओडिशात बीजेडीला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पार्टी, आरजेडी, तेलंगणा राष्ट्र समिती, एआयएडीएमकेचे प्रत्येकी दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. JMM, JD(U), SP आणि RLD आणि अपक्ष कपिल सिब्बल यांच्याकडून प्रत्येकी एक.
महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान - महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार उभे आहेत. त्यामुळे राज्यात मतदान घ्यावे लागत आहे. सत्तारुढ महाविकास आघाडी आणि भाजपाच्या आमदारांचा घोडेबाजार होण्याचे आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजुंनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक (भाजपा), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस), संजय राऊत और संजय पवार (शिवसेना) आणि इम्रान प्रतापगढी (कांग्रेस) या सहा जागांसाठी मैदानात आहेत. यातील मुख्य लढत भाजपाचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यामध्ये आहे.
एआयएमआयमचा आघाडीला पाठिंबा - महाराष्ट्रातमध्ये एआयएमआयम पक्षाचे दोन आमदार आहे. एआयएमआयम पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. या पक्षाचे दोन्ही आमदार काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांन मतदान करणार आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येकी एका उमेदवाराला काही मते कमी पडणार आहेत. अपक्ष आणि छोटे पक्ष कोणाच्या बाजुने मतदान करणार त्यावर शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांचे भवितव्य ठरणार आहे.