नवी दिल्ली : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी पार पडणार आहे. भाजपने ईशान्येकडील ताकदवान पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेतली आहे. या तीनही राज्यांमध्ये भाजप सरकार येईल असा दावा भाजप करत आहे. तीन राज्यांव्यतिरिक्त, तामिळनाडूतील सागरदिघीमधील इरोड (पूर्व) जागेसाठी पोटनिवडणुकीचाही निकाल आज घोषित होणार आहे. मेघालय, त्रिपुरामध्ये 87.76 टक्के मतदान पार पडले होते. तर नागालँडमध्ये 85.90 टक्के आणि मेघालयमध्ये 85.27 टक्के मतदान झाले होते.
13:48
भाजपचे राज्य अध्यक्ष तेमजेन इम्ना यांनी निर्णायक आघाडी घेतल्यानंतर हारकर जितने वाले को बाजिगर कहते है असे म्हटले आहे.
नागालँड विधानसभा मोजणीच्या पहिल्या फेरीत मागे पडल्यानंतर भाजपचे नागालँडचे प्रमुख तेमजेन इम्ना यांनी गुरुवारी त्यांच्या मतदारसंघामध्ये चांगलीच आघाडी घेतली आहे. दुपारी १२.१5 वाजता निवडणूक आयोगाने जारी केलेल्या ताज्या मोजणीच्या ट्रेंडनुसार, नागालँडचे प्रमुख जनता दल (युनायटेड) उमेदवार जे. लानू लाँगचर हे १,२०२ भाजपा आघाडीवर आहेत.
01:12
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की पंतप्रधान मोदी यांच्यां कामामुळे विजय निश्चित
ईशान्येत भाजप ज्या प्रकारे जिंकत आहे आणि लोकांचा पाठिंबा मिळवित आहे, त्यामागील साधे कारण म्हणजे पंतप्रधान मोदी यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचत आहे. हे सूत्र आहे. जर आपण निवडणूक जिंकत असाल तर याचा अर्थ असा की आपण लोकांचा विश्वास जिंकत आहोत.
13:08
भाजपच्या पी. बाशांगमोंगबा चँग यांनी कॉंग्रेसच्या टोयांग चँग यांचा 5,644 मतांनी पराभव केला.
12:56
मेघालयमध्ये रॅलियांग विधानसभा मतदार क्षेत्रात एनपीपीचे कमिंग वन यंबॉन यांनी विजय मिळवला. 5000 हून अधिकच्या मताधिक्याने लाखोन बिआम यांचा पराभव करत विजय मिळवला.
12:43
देबबर्मा यांची त्रिपुरा मोथा पार्टी भाजपला पाठिंबा देईल, त्रिपुरा येथे भाजप सरकारची स्थापना होणार हे निश्चित.
12:16
त्रिपुराची बोरडोवली सीट मुख्यमंत्री मनिक साहा यांनी जिकली.भाजपचे उमेदवार अभिषेक देबरॉय यांनी मातरबाडीच्या जागेवरुन विजय मिळविला आहे. 2018 च्या त्रिपुराच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बिप्लब कुमार यांनी सापीएमच्या मधाब चंद्र साहा यांचा पराभव केला होता. 1569 एवढ्या मताधिक्याने पराभव केला होता.
12:09
मेघालयच्या नार्तियांग जागेवरून एनपीपीचे स्नियाभलंग धार जिंकले 2,123 मतांनी त्यांचा विजय झाला. मेघालयातील 27 जागांवर कॉनोरोड संगमाची एनपीपी आघाडीवर आहे. इतर 17 जागा पुढे आहेत. टीएमसी 7, भाजपा 4 आणि कॉंग्रेस 4 जागांवर पुढे आहेत.
12:03
नागालँडमधील भाजपा-एनडीपीपी अलायन्स 37 जागांवर पुढे आहे. येथे बहुमताचा आकडा 31 आहे. इतर 16 जागांवर लोक जानशकती पार्टीचे 3 उमेदवारांचा समावेश आहे. कॉंग्रेसला केवळ 2 जागांवर संतूष्ट राहावे लागले. कॉनरॉड संगमा एनपीपी 3 आणि एनपीएफ 2 जागांमध्ये पुढे आहे.
11:37 -नागालँडचे उपमुख्यमंत्री यॅनथुंगो पॅटन म्हणाले की आमची युती खूप पुढे आहेत. मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला मजबूत बहुमत मिळणार आहे. यावेळी आम्हाला मागील निवडणुकीच्या निकालांपेक्षा अधिक जागा मिळतील.
11.21 -सीएम कॉनरॉड संगमाच्या निवासस्थानी विजयाच्या उत्सवांची तयारी
मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॉड संगमाच्या निवासस्थानी विजय साजरा करण्यासाठी तयारी सुरू आहे. त्यांचा पक्ष राष्ट्रीय पीपल्स पार्टी अजूनही काही ठिकाणी पुढे आहे.
11.20 -मुख्यमंत्री कॉनरॉड सांगमा यांनी माजी मुख्यमंत्री पीए संगमा यांना श्रद्धांजली वाहिली.
मेघालयाचे सध्याचे मुख्यमंत्री, कॉनरॉड संगमा, त्यांची आई सोरदिनी के संगमा, भाऊ जेम्स संगमा आणि संगमाची बहीण अगाथा, संगमा यांचे वडील या सर्वांनी टूरा येथीलसमाशानभूमनीत जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
10:43 -मेघालयात, कॉनरॉड संगमाचा एनपीपी सर्वात मोठा पक्ष बनला, टीएमसी आता 7 जागांवर पासा वळताना दिसला आहे. कॉनरॉड संगमाची एनपीपी आता सर्वात मोठी पार्टी बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. नवीनतम ट्रेंडमध्ये एनपीपी 24 जागांवर आघाडीवर आहे. टीएमसी जे काही काळापूर्वी किंगमेकरच्या भूमिकेत दिसले होते, आता ते केवळ 8 जागांवर आघाडीवर आहेत.मेघालयातील 6-6 जागांवर भाजप आणि कॉंग्रेस आघाडीवर आहेत.
10:02 -त्रिपुरामध्ये टिपरा मोथा किंगमेकर होऊ शकतो. बहुमताचा आकडा गाठल्यानंतर भाजपने पुन्हा बहुमत गमावले आहे. ताज्या ट्रेंडनुसार, भाजप 27 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस आघाडी 19 आणि तिरपा मोथा 12 जागांवर आघाडीवर आहे.
09:44 -त्रिपुरा आणि मेघालयात काटे की टक्कर पहायला मिळत आहे. त्रिपुरातील 60 जागांच्या ट्रेंडमध्ये भाजप 31 जागांवर पुढे आहे. काँग्रेस-डावी आघाडी 18 जागांवर पुढे आहे. टिपरा मोथा 11 जागांवर, अपक्ष उमेदवार 1 जागेवर पुढे आहे. मेघालयातील स्पर्धा अधिकच रंजक बनली आहे. येथे मुकुल संगमा यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने चमकदार कामगिरी केली आहे. मेघालयमध्ये टीएमसी 14 जागांवर आघाडीवर, एनपीपी 13 जागांवर, भाजप 6 आणि कॉंग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे.
09:33 -नागालँड निकाल पाहयाला गेले तर सुरुवातीच्या ट्रेंडनुसार एनडीपीपी आणि भाजप आघाडीवर आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार एनपीएफ 5 जागांवर आघाडीवर आहे.
09:09 -नागालँड निवडणूक निकाल: भाजप 52 जागांवर पुढे आहे. एनडीपीपीचे शामटोर चेसर पुढे आहे., भाजप घासपानीमध्ये पुढे आहे, नागालँडमध्ये 60 पैकी 59 जागांवर निवडणुका झाल्या आहेत. अकुलुतो येथे भाजप उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.
08:58 -नागालँडमध्ये परिस्थिती स्पष्ट झाली आहे. येथे 60 पैकी 59 जागांचे ट्रेंड आले आहे. त्यात भाजप आघाडी 51 जागांवर पुढे आहे. एनपीएफ 6 जागांवर पुढे आहे. काँग्रेस 2 जागांवर पुढे आहे.
08:55 -टीएमसी मुकुल संगमा आणि कॉनराड संगमा यांच्यात कडवी झुंज पहायला मिळत आहे. मेघालयातील ट्रेंडमध्ये मुकुल संगमा यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस कॉनरॅड संगमा यांना कडवी झुंज देत आहे. आतापर्यंत 55 जागांसाठी ट्रेंड आले आहेत, ज्यामध्ये एनपीपी 16 , टीएमसी 15 जागांवर पुढे आहे. भाजप, काँग्रेस आणि इतर प्रत्येकी 8 जागांवर आघाडीवर.
08:34 -भाजप त्रिपुरात सर्वात मोठा पक्ष बनला, टिपरा माथा 15 जागांवर आघाडीवर, त्रिपुरातील 60 पैकी 57 जागांसाठी कल आहेत. यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. काँग्रेस आणि डाव्या आघाडीची युती 16 जागांवर पुढे आहे. तर पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा टिपरा मोथा 15 जागांवर पुढे आहे. भाजप बहुमतासाठी पाच जागा कमी आहेत.
विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या : मेघालयाचे मुख्यमंत्री नॅशनल पीपल्स पार्टीचे नेते कॉनरॅड संगमा यांनी मंगळवारी रात्री आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतली होती. सत्ताधारी आघाडीत या दोघांची युती होती. त्यानंतर विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या गेल्या. भाजप नेते ऋतुराज सिन्हा यांनी तीनही राज्यांमध्ये पक्षाच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी केलेले चांगले काम ईशान्येतील लोकांनी पाहिले आहे. या राज्यांमध्ये आमचे सरकार निवडून येईल. आमचे मताधिक्य वाढेल, असे सिन्हा यांनी मंगळवारी सांगितले.
त्रिपुरामध्ये भाजप आशावादी : 2018 च्या निवडणुकीत त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांना त्यांच्या बालेकिल्ल्यावरून भाजपने हुसकावून विक्रम नोंदवला होता. त्यांच्या विजयाची घोडदौड सुरू आहे. या निवडणुकीत भाजपला कडवी टक्कर देण्यासाठी डावे पक्ष आणि काँग्रेस यांनी हातमिळवणी केली आहे. भाजपने मागील विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष आयपीएफटीसोबत युती केली होती. त्रिपुरामध्ये भाजपने 60 सदस्यीय विधानसभेच्या 55 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. डाव्या आघाडीने 47 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, काँग्रेसने 13 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. टिपरा मोथा यांनी 42 जागांवर तर तृणमूल काँग्रेसने 28 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मुख्यमंत्री माणिक साहा यांनी टाउन बारडोवली मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.
निकालांकडे सर्वांचे लक्ष :भाजप नेत्यांनी त्यांच्या प्रचारात सीमावर्ती राज्यातील विकासाची गती आणि गेल्या पाच वर्षातील "डबल इंजिन" सरकारच्या प्रयत्नांबद्दल सांगितले. टिपरा मोथा यांनी ग्रेटर टिपरलँडची मागणी केली आहे. मेघालयात 60 पैकी 59 विधानसभा जागांसाठी मतदान झाले आहे. राज्याचे माजी गृहमंत्री एचडीआर लिंगडोह यांच्या निधनामुळे सोहियोंग विधानसभा मतदारसंघाचे मतदान पुढे ढकलण्यात आले होते. नॅशनल पीपल्स पार्टी आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आहे.
तृणमूल काँग्रेससाठी मेघालय महत्त्वाचे : तृणमूल काँग्रेस, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी, पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट सारखे प्रादेशिक पक्ष जोरदार लढा देण्याचा प्रयत्न करत आहेत. निकालामुळे राज्यात विविध शक्यता निर्माण होऊ शकतात. भाजप आणि काँग्रेसने 59 जागा लढवल्या तर एनपीपीने 59 जागा लढवल्या आहेत. तृणमूल काँग्रेससाठी मेघालय महत्त्वाचे आहे. तिथे तृणमूल काँग्रेसने 57 जागा लढवल्या आहेत. मुख्यमंत्री कॉनराड के संगमा दक्षिण तुरा मतदारसंघातून तर तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल संगमा हे सोंगसाक आणि टिकरिकिला मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. नागालँडमध्ये सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) 40 जागा लढवत आहे. तर त्यांचा मित्रपक्ष भाजपने 20 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
हेही वाचा :Nagpur Threat Call: अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याच्या धमकी कॉल प्रकरणी गुन्हा दाखल