नवी दिल्ली :Vladimir Putin On Modi: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मंगळवारी रशियाच्या व्लादिवोस्तोक बंदरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचे कौतुक केले. पुतिन म्हणाले की, मेक इन इंडिया कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन पंतप्रधान मोदी योग्य काम करत आहेत. रशियन राष्ट्रपतींनी 8 व्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (EEF) मध्ये रशियन बनावटीच्या गाड्यांबाबत एका माध्यमाच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
रशियन बनावटीच्या गाड्या : देशांतर्गत उत्पादनांचे महत्त्व सांगताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताच्या धोरणांचे कौतुक केले. देशांतर्गत उत्पादित मोटारगाड्यांचा वापर केला पाहिजे. भारताचा संदर्भ देत पुतिन म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने आपल्या धोरणांद्वारे एक आदर्श निर्माण केला आहे. 1990 च्या दशकात आमच्याकडे देशांतर्गत कार तयार होत नव्हत्या, पण आता आम्ही करतो असे पुतिन यांनी सांगितले. तसंच ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाला चालना देऊन योग्य काम करत आहेत असे ही ते म्हणाले.
या देशांचा आर्थिक फायदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 शिखर संम्मेलनादरम्यान भारत मध्य-पूर्व यूरोप आर्थिक कॉरिडोरची घोषणा केली होती. या कॉरिडोरमुळे भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि यूरोपियन युनियन हे देश आर्थिक सहकार्यासाठी परस्पराशी जोडले जातील. हा कॉरिडोर भारताला पश्चिम आशिया आणि युरोपशी जोडेल. कॉरिडोर भारत, मध्य-पूर्व आणि यूरोप दरम्यान आर्थिक सहकार्याचा एक मोठं माध्यम ठरेल.
याआधीही पुतिन यांनी 'मेक इन इंडिया'चे कौतुक केले :पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू केलेल्या मेक इन इंडियाचे आता भारतीय अर्थव्यवस्थेवर चांगले परिणाम दिसत असल्याचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी सांगितले होते. त्यामुळे जागतिक पातळीवर मेक इन इंडिया या संकल्पनेचे कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा -
- Annual Meeting : पंतप्रधान मोदी वार्षिक बैठकीसाठी मॉस्कोला जाणार नाहीत, पुतिन भारतात येण्याची शक्यता?
- Putin Assassination: ब्लादिमीर पुतिन यांच्यावरील हल्ल्याबाबत शंका, आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी व्यक्त केला मत
- Vladimir Putin On Pm Modi : व्लादिमीर पुतीन यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक; मेक इन इंडियाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम