नवी दिल्ली- काश्मीर फाईल्सनंतर चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी दिल्ली फाइल्सची निर्मिती करणार ( vivek agnihotri announced the delhi files ) असल्याची घोषणा केली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, काश्मीरच्या फाइल्सनंतर आता दिल्लीच्या फाइल्सवर काम करण्याची वेळ आली आहे. चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या या घोषणेनंतर दिल्लीतून निवडून आलेले भाजप खासदार गौतम गंभीर यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ( delhi files Gambhir targets Delhi Cm ) टोला लगावला आहे. दिल्लीतील अन्याय, अत्याचार आणि निर्घृण हत्या पीडितांना न्याय मिळेल, असे गंभीर यांनी म्हटले आहे.
भाजप खासदार गौतम गंभीर यांनी ट्विटमध्ये केजरीवाल यांना श्रीमान प्रामाणिक ( Gautam Gambhir on Mister Honest ) असे म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की दिल्ली फाईल्स हा चित्रपट यूट्यूबवर अपलोड केला जाईल का, हे पाहावे लागेल. गंभीरने ट्विटच्या शेवटी दिल्ली फाइल्स (DelhiFiles) हा ( Guatam Gambhir on Delhi files ) हॅशटॅगही लिहिला. दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 24 मार्च रोजी सांगितले की, काश्मीर फाइल्स करमुक्त करण्याची मागणी का केली जात आहे. काश्मीर फाईल्स हा युट्युबवर अपलोड करावा, जेणेकरून प्रत्येकाला सिनेमा सहज दिसेल. भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, आता ते दारूबाबत बोलत नाहीत. कारण काश्मीर फाईल्स आल्या आहेत.
द काश्मीर फाईल्सची चर्चा- विवेक अग्नीहोत्रीच्या दुसर्या पोस्टमध्ये फक्त 'द दिल्ली फाइल्स' लिहून नवीन चित्रपटाच्या नावाचा उल्लेख केला. त्यावरून त्याच्या चाहत्यांना चित्रपटाच्या कथेचा अंदाज येत आहे. 11 मार्च रोजी देशभरात प्रदर्शित झालेल्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या निर्गमन आणि नरसंहाराचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटात विवेक अग्निहोत्रीची पत्नी पल्लवी जोशी व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार मुख्य भूमिकेत होते.