महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Virat Kohli 100th T20I match सर्व फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा कोहली ठरणार पहिला भारतीय खेळाडू - Virat Kohli latest records

आशिया चषक 2022 च्या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी भारत रविवारी दुबईमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करेल. तेव्हा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या 100 व्या T20I सामन्यात Virat Kohli 100th T20I match देशाचे प्रतिनिधित्व करेल. यादरम्यान, खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी शंभर सामने खेळणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू ठरेल.

VIRAT KOHLI
विराट कोहली

By

Published : Aug 27, 2022, 1:03 PM IST

Updated : Aug 27, 2022, 4:28 PM IST

अबू धाबी स्टार फलंदाज विराट कोहली Star batsman Virat Kohli पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्याचे शतक करणार आहे. म्हणजे तो आपल्या 100 टी-20 सामना Virat Kohli's 100th T20I match खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यात त्याचा शतकांचा दुष्काळ संपेल अशी अपेक्षा आहे. तसेच कोहली भारताकडून खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये शंभर सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरेल. 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून विराट सतत क्रिकेट खेळत आहे. त्याच्या शानदार कारकिर्दीत विविध चढ-उतार असूनही ही आकडेवारी सातत्य दर्शवते. ज्यातून त्याची खेळाप्रती असलेली आवड आणि समर्पण दिसून येते.

कोहलीला कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावून 1,000 पेक्षा जास्त दिवस झाले

रविवारी पाकिस्तानविरुद्धचा India vs Pakistan सामना खेळण्यासाठी कोहली मैदानात उतरेल तेव्हा सामना जिंकून देणारा डाव खेळण्याचा विचार त्याच्या मनात असेल. शेवटच्या वेळी हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एका T20 सामन्यात आमनेसामने आले होते, तेव्हा भारताला 10 विकेट्सने लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात कोहलीने 49 चेंडूत 57 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने 20 षटकांत 151/7 अशी धावसंख्या गाठली. पण पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान (79*) आणि बाबर आझम (68*) यांनी भारताचा सहज पराभव केला. रविवारी हा स्टार फलंदाज मॅचविनिंग इनिंग खेळून आपला फॉर्म परत मिळवतो का याकडे सर्वांच्या नजरा असतील. चाहतेही कोहलीच्या 71व्या आंतरराष्ट्रीय शतकाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. कोहलीला कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावून 1000 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत.

2022 हे कोहलीसाठी कठीण वर्ष होते

नोव्हेंबर 2019 मध्ये त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय शतकापासून, कोहलीने एकूण 27 T20 सामने खेळले आहेत, त्याने या फॉरमॅटमध्ये 42.90 च्या सरासरीने 858 धावा केल्या आहेत Virat Kohli runs in T20 format . त्याची टी-20 मधील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 94 आहे. नोव्हेंबर 2019 पासून त्याने T20 मध्ये आठ अर्धशतके झळकावली आहेत. कोहलीने त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय शतकापासून सर्व फॉरमॅटमध्ये मिळून 68 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान 82 डावांमध्ये 34.05 च्या सरासरीने 2,554 धावा केल्या आहेत. सर्व फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या या 68 सामन्यांमध्ये त्याने 24 अर्धशतके झळकावली आहेत. विशेषत: 2022 हे वर्ष विराटसाठी खूप कठीण गेले. या वर्षी विराटने त्याच्या संघासाठी फक्त चार टी-20 सामने खेळले असून, त्याने 20.25च्या सरासरीने 81 धावा केल्या आहेत. या वर्षातील त्याची टी-20 मधील सर्वोत्तम धावसंख्या 52 आहे. यावर्षी कोहलीने सर्व फॉरमॅटमध्ये 16 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 19 डावांमध्ये तो 25.05 च्या सरासरीने केवळ 476 धावा करू शकला आहे. त्याने केवळ 4 अर्धशतके झळकावली असून त्याच्या सर्वोत्तम स्कोअर 79 आहेत.

कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 64.58

विराट टीम इंडियाकडून आतापर्यंत 99 टी-20 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 50.12 च्या सरासरीने 3,308 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये भारतासाठी त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या नाबाद 94 आहे. या धमाकेदार प्रवासात त्याने एकूण 30 अर्धशतके झळकावली आहेत. 2017-2021 दरम्यान, या स्टार फलंदाजाने कर्णधार म्हणून 50 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व Virat Kohli strike rate in T20 format केले आहे. या 50 सामन्यांपैकी 30 जिंकले, 16 हरले, दोन सामने टाय झाले आणि इतर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. या फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून त्याची विजयाची टक्केवारी 64.58 होती. जे या फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या इतर अनेक कर्णधारांपेक्षा सरस आहे.

हेही वाचा -Women World Cup फिफाने भारतात होणाऱ्या Aiff, U 17 महिला विश्वचषक स्पर्धेवरील बंदी उठवली

Last Updated : Aug 27, 2022, 4:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details