आणंद ( गुजरात ) : गुजरातमधील आणंद जिल्ह्यात ( Anand District Gujrat ) जातीय संघर्षात एक पोलीस हवालदार आणि अन्य तीन जण जखमी झाले ( Violence in Gujrat ) आहेत. एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, शनिवारी रात्री बोरसद शहरात वादग्रस्त भूखंडावरून झालेल्या हाणामारीच्या संदर्भात पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. पोलिस उपअधीक्षक डी.आर. पटेल म्हणाले की, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी ५० अश्रुधुराच्या गोळ्या आणि ३० रबर गोळ्या झाडल्या.
पोलीस बंदोबस्त तैनात :ते म्हणाले की, शहरात प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यांनी सांगितले की, शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास एका समाजाचे काही लोक वादग्रस्त भूखंडावर विटा टाकत होते. इतर समाजाच्या काही लोकांनी याला विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी सुरू झाली. नंतर वाद इतका वाढला की, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. ते म्हणाले की, माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही समाजातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.