महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Jharkhand Horses: बुढा पहाड परिसरातील नागरिक खरेदी करत आहेत घोडे, सुरक्षा दलाच्या मदतीने मिळाला रोजगार

झारखंडमधील नक्षलवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या बुढा पहाडावर आता सुरक्षा दलांनी आपल्या छावण्या उभारल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा दलांनी येथील गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी घोडे घेण्याचे आवाहन केले आहे. यातील अनेक गावकरी घोडे घेऊन सुरक्षा दालाचे साहित्य बुढा पाहाडावर पोहोचवत आहेत.

Villagers Of Budha Pahad Buying Horse
संपादित छायाचित्र

By

Published : Jan 28, 2023, 10:06 PM IST

पलामू -बुढा पहाड परिसरातील सुरक्षा दल पोहोचल्यानंतर गावकऱ्यांसाठी रोजगाराची अनेक दारे खुली झाली आहेत. सुरक्षा दलांच्या छावण्यांमध्ये साहित्य पोहोचवून गावकरी पैसे कमावत आहेत. गावकरी पायी किंवा घोड्याच्या मदतीने डोंगरावरील सुरक्षा दलाच्या छावण्यांमध्ये सामान पोहोचतात. सामान पोहोचवण्यासाठी त्यांना मोबदला दिला जातो. यातून चांगले उत्पन्न मिळण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान गावकऱ्यांना घोडे खरेदीसाठी प्रोत्साहन देत आहेत.

बुढा पहाड परिसरातील नागरिक खरेदी करत आहेत घोडे

घोड्यावर साहित्य पोहोचवल्यावर मिळतात 500 रुपये :बुढा पहाडवर पायी माल पोहोचवणाऱ्यांना प्रतिट्रिप 100 रुपये मिळतात. तर घोड्यावर माल पोहोचवणाऱ्यांना 500 रुपये दिले जातात. सुरक्षा दलांनी गावकऱ्यांना घोडे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देता येईल. सुरक्षा दलाच्या आवाहनानंतर अनेक गावकऱ्यांनी घोडे विकत घेतले आहेत. मात्र, दररोज अनेक युवक बुढा पहाडवर पायी साहित्य पोहोचवण्याचे काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बुढा पहाडवर बनवणार रस्ता :बुढा पहाडवरील सुरत्रा दलाच्या शिबिरात सामान पोहोचवण्यासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यातून गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती पलामू रेंजचे पोलीस महासंचालक राजकुमार लाक्रा यांनी सांगितले. सुरक्षा दलांच्या छावण्याला लागणारे साहित्य गावकऱ्यांनी पुरवले तर हे काम त्यांना मिळेल. त्यातून गावकऱ्यांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागणार नाही. आगामी सहा-आठ महिन्यात या भागात रस्ते बनवण्यात येतील. त्यामुळे येथील नागरिकांना कोणतीही अडचण येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो बुढा पहाड चढायला :बुढा पहाड झारखंडच्या गढवा जिल्ह्यात आहे. त्याची सीमा छत्तीसगडच्या लातेहार आणि बलरामपूरला लागून आहे. येथे जाण्यासाठी छत्तीसगडमधील पुंडग गावातून आणि लातेहारच्या तिसिया गावातून थेट चढावे लागते. दोन्ही बाजूंनी डोंगरावर चढण्यासाठी लोकांना दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र स्थानिक तरुण 40 मिनिटांत हा डोंगर चढू शकतात. आदिवासी कुटुंबातील तरुण सुरक्षा दलांच्या पुरवठा लाइनशी जोडले गेले आहेत.

कोरवा आणि बिरजिया जमातींचे प्राबल्य :केंद्र सरकारने आदिवासी जमातीला आरक्षित कोट्यात समावेश केला आहेत. या भागात कोरवा आणि बिरजिया जमातींचे प्राबल्य आहे. सुरक्षा दलांच्या छावणीत दररोज पायी माल पोहोचवत असल्याचे येथील ग्रामस्थ सुधीर याने सांगितले. यातून आमची कमाई होत आहे. मालानुसार पैसे मिळत असल्याची माहिती येथील इस्लाम यांनी सांगितले. त्याला बुढा पहाड चढायला एक तास लागतो. पोलीस आणि सुरक्षा दलांनीही गावकऱ्यांना घोडे विकत घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे माल पोहोचवणे सोपे जाईल असेही त्याने सांगितले.

नक्षलवादी करायचे घोड्याचा वापर :बुढा पहाड परिसरात नक्षलवादी घोड्याचा वापर करायचे. मात्र ते गावकऱ्यांकडून पायीच माल घ्यायचे. 2015-16 मध्ये सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे घोडे जप्त केले होते. ग्रामस्थांनी साहित्य देण्यासाठी घोडे खरेदी करण्यास सुरुवात केल्याची माहिती येथील ग्रामस्थ मुस्ताक याने सांगितले आहे. छत्तीसगडमधील कुस्मी भागातील गावकरी चार ते पाच हजार रुपयांना घोडा विकत घेत असल्याचेही तो म्हणाला.

बुढा पहाडावर कोब्रा आणि सीआरपीएफ तैनात :बुढा पहाड आणि आसपासच्या परिसरात अर्धा डझनहून अधिक पोलीस छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये कोब्रा आणि सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. परिसरातील बुढा, तिडिया, नवटोली, बहेरटोली, खापरी महुआ येथे पोलीस छावण्या लावण्यात आल्या आहेत. या छावण्या डोंगराच्या रांगेत वसलेल्या आहेत. तिथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने या पायी जावे लागते. दोन हजारांहून अधिक सैनिक छावण्यांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. जवानांपर्यंत साहित्य पोहोचवणे हे मोठे आव्हान आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अनेक ठिकाणी साहित्य पोहोचवले जात असल्याची माहितीही यावेळी सुरक्षा दलाच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis on S Jaishankar : देवेंद्र फडणवीसांनी केले परराष्ट्रमंत्र्यांचे कौतुक; म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details