महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Vellore Gang Raped : नागपूरमधील तरुणाच्या मैत्रिणीवर तमिळनाडूत सामूहिक बलात्कार, चित्रपट पाहून परतताना घडली घटना - Medical Student gang raped in Vellore

रात्री उशिरा चित्रपट पाहून घरी परतणाऱ्या एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाच जणांनी बलात्कार (Gang raped Medical Student) केल्याची घक्कादायक घटना घडली आहे. 17 मार्चला तामिळनाडूमधील वेल्लोर (Vellore) जिल्ह्यातील कटपाडी येथे ही घटना घडली आहे.

Vellore Gang Raped
वेल्लोर बलात्कार प्रकरण

By

Published : Mar 23, 2022, 7:09 PM IST

Updated : Mar 23, 2022, 7:49 PM IST

वेल्लोर(तामिळनाडू) - रात्री उशिरा चित्रपट पाहून घरी परतणाऱ्या एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाच जणांनी बलात्कार (Gang raped Medical Student) केल्याची घक्कादायक घटना घडली आहे. 17 मार्चला तामिळनाडूमधील वेल्लोर (Vellore) जिल्ह्यातील कटपाडी येथे ही घटना घडली आहे. पीडित मुलगी आपल्या मित्रासोबत चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. पीडिता मूळची बिहारची (Bihar) असून, तिचा मित्र हा नागपूरचा (Nagpur) रहिवासी आहे. हे दोघेही वेल्लोर येथे वैद्यकीय शिक्षण (Vellore Medical Student) घेत होते. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

दुसऱ्या प्रकरणाच्या तपासादरम्यान घटना समोर :ही घटना 17 मार्चला घडली असून, 21 मार्चला उघडकीस आली. सत्तुवाचारी पोलिसांनी 2 जणांना रात्री वेल्लोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकमेकांशी भांडण केल्याप्रकरणी अटक केली होती. पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली असता, बलात्काराचा प्रकार समोर आला. त्यानंतर धागेदोरे उलगडले आणि पोलिसांनी याचा खोलात जाऊन तपास केला.

पीडिता मूळची बिहारची, तिचा मित्र नागपूरचा : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची बिहारची आहे आणि तिचा मित्र मूळचा नागपूरचा रहिवासी आहे, हे दोघेही 17 मार्चला पहाटे 1 च्या सुमारास चित्रपट पाहून परत घरी येत होते. दोघे एका ऑटोरिक्षात चढले, त्यांना सांगण्यात आले की हा शेअर ऑटो असून त्यात आधीच पाच तरुण आहेत. तरीही ते दोघेही यात बसले. त्यानंतर परिसरातील निर्जन ठिकाणी त्यांना नेले आणि चाकूचा धाक दाखवून मुलीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील मोबाईल फोन, 40 हजार रुपये रोख आणि दोन सोन्याचे दागिने घेऊन ते पसार झाले.

चार आरोपींना अटक :एका प्रकरणात पोलीस दोघांची चौकशी करत होते. या चौकशीवेळी त्यांनी हा घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला पीडित मुलगी तक्रार करण्यास टाळाटाळ करत होती. त्यानंतर तिने २२ मार्च रोजी वेल्लोर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ईमेलद्वारे तक्रार केली. याप्रकरणाच्या तपासासाठी वेल्लोर पोलीस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करण्यात आली आहे. यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. लवकरात लवकर इतर आरोपीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती वेल्लोरचे पोलीस अधीक्षक एस राजेश कन्नन यांनी दिली आहे.

Last Updated : Mar 23, 2022, 7:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details