लंडन/यूके/फ्रान्स -यूरोपमध्ये अनेक देशांमध्ये आजपासून व्यापक स्तरावर कोविड-19 व्हॅक्सीनचे लसीसकरण सुरू झाले आहे. जर्मनी, हंगरी आणि स्लोवाकिया आदि देशांनी या महामारीच्या विरोधात व्हॅक्सिनेशनला सुरुवात केली आहे. स्पेन आणि फ्रान्समध्ये आजपासून लसीकरण सुरू होत आहे.
कोरोनाचे नवे रुप पहिल्यापेक्षा घातक -
ब्रिटनमध्ये समोर आलेला कोरोना व्हायरसचा नवा प्रकार गतीने पसरत आहे. आधीच्या कोरोनापेक्षा नवा प्रकार अधिक घातक असल्याचे म्हटले जात आहे. ब्रिटनमधून आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जात आहे. या आडवड्यात ब्रिटनची विमान सेवा निलंबित करण्यात आली आहे.
यापूर्वी मेक्सिकोमध्येही कोरोना व्हायरसविरोधात लसीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. येथील लोकांना अमेरिकी प्रयोगशाळा फायझर आणि त्यांची जर्मन सहयोगी कंपनी बायोएनटेकद्वारे विकसित व्हॅक्सिन दिली जात आहे.
सिन्हुआ वृत्त संस्थेच्या अहवालानुसार व्हॅक्सिनसाठी सर्वात आधी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. मेक्सिकोच्या राजधानीत कोरोना व्हायरसचा उद्रेक सर्वाधिक झाला होता. येथे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 3 लाख 2 हजार 199 पर्यंत पोहोचला होता तर २० हजार ४७२ लोकांचा मृत्यू झाला होता.