देहरादून Uttarakhand Tunnel Rescue : सिलक्यारा बोगदा अपघातातील बचावकार्य अंतिम टप्प्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेले 41 मजूर कधीही बाहेर येऊ शकतात. उत्तरकाशीच्या चारधाम रोड प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढताच रुग्णालयात दाखल करण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील उत्तरकाशीत डेरेदाखल झाले आहेत. बोगद्याच्या बाहेर 41 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. तर गंभीर झालेल्या कामगारांना एअर लिफ्ट करण्यासाठी चिनूक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बचावकार्य अंतिम टप्प्यात असून काही अडथळे आहेत. मात्र कामगारांची लवकरात लवकर सुटका होईल, अशी मला आशा आहे. बचावानंतरची तयारी सुरू करण्यात आली आहे. कामगारांची तपासणी, उपचारांसाठी रुग्णवाहिका सज्ज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दररोज बचावकार्याचं अपडेट घेत आहेत. याबाबत सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच सगळं अपडेट घेतलं आहे.- मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी घटनास्थळी दाखल : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सिलक्यारा बोगदा बचावकार्य सुरु असलेल्या ठिकाणी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी "ऑगर मशीननं 45 मीटर पाइपलाइन टाकण्यात आली. बचावकार्य अंतिम टप्प्यात असून काही अडथळे आहेत. मात्र कामगारांची लवकरात लवकर सुटका होईल, अशी मला आशा आहे. बचावानंतरची तयारी सुरू करण्यात आली आहे. कामगारांची तपासणी, उपचारांसाठी रुग्णवाहिका सज्ज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दररोज बचावकार्याचं अपडेट घेत आहेत. याबाबत सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच सगळं अपडेट घेतलं आहे. आमचे तज्ज्ञ कामगारांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत" असं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यावेळी सांगितलं.
पोस्ट रेस्कू ऑपरेशन प्लॅन आहे तयार :सिलक्यारा बोगद्यात अडकलेले कामगार कोणत्याही वेळी बाहेर येऊ शकतात, असं प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे. आता प्रशासनानं बचावानंतरचा कृती आराखडा तयार केला आहे. याबाबतची माहिती उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी "आमचा बचावानंतरचा कृती आराखडा तयार झाला आहे. आम्ही कामगारांना ग्रीन कॉरिडॉरमधून तत्काळ नेऊन त्यांना शक्य तितके चांगले उपचार देणार आहोत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना चिन्यालिसौर आणि गरज पडल्यास ऋषिकेशला नेलं जाईल. बोगद्याच्या घटनास्थळी केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंग (निवृत्त) आणि सचिव देखील येणार आहेत" अशी माहितीही पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी दिली.