ललितपूर (उत्तर प्रदेश) GF Cut BF Private Part : उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका प्रेयसीनं चक्क आपल्या प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट चाकूनं कापला.
तरुणाची प्रकृती गंभीर : झालं असं की, 7 जानेवारीला सकाळी ही प्रेयसी काही लोकांना घेऊन प्रियकराच्या घरी पोहोचली. तिथे तिनं प्रियकरावर हल्ला करत त्याचा प्रायव्हेट पार्ट चाकूनं कापला. तरुणानं आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेलं. सध्या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. तरुणीचं या तरुणावर खूप प्रेम होतं. तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. मात्र तरुणानं लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणीनं हे पाऊल उचललं.
अशी ओळख झाली : या प्रकरणी पोलीस अधीक्षक मोहम्मद मुस्ताक यांनी अधिक माहिती दिली. हा तरुण आणि तरुणी मजूर म्हणून राजस्थानला गेले होते. तेथे दोघांची मैत्री झाली. काही दिवसांनी दोघंही एकत्र राहू लागले. मुलीचं त्या तरुणावर खूप प्रेम होते. तिला तरुणाशी लग्न करायचं होतं. काही दिवसांपूर्वी दोघंही आपापल्या गावी परतले. येथे आल्यानंतरही दोघांचं बोलणं सुरूच होतं. मात्र काही काळानंतर तरुणानं तिला टाळायला सांगितलं होतं.
लग्नाला नकार दिला : या सर्व प्रकारानं तरुणी अस्वस्थ झाली. तिनं तिच्या प्रियकराला लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा त्यानं लग्नाला साफ नकार दिला. याचा तिला राग आला. रविवारी पहाटे चार वाजता ती काही लोकांसह प्रियकराच्या घरी पोहोचली. तिनं त्यांच्या मदतीनं तरुणाला पकडलं. यानंतर तरुणीनं आपल्या प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट चाकूनं कापून पळून गेली. यानंतर तरुणाला रक्तस्त्राव आणि वेदना सुरू झाल्या. त्याचा आवाज ऐकून कुटुंबातील लोक जागे झाले. त्यांनी तरुणाला जिल्हा रुग्णालयात नेलं. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्याला झाशी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असं एसपींनी सांगितलं.
हे वाचलंत का :
- गुटख्याच्या पुडीवरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीवरून मित्रानेच केला मित्राचा खून
- माणुसकीचा अंत! अल्पवयीन मुलीवर 13 जणांचा सामूहिक बलात्कार