Goa Assembly Election 2022 : भाजपची डोकेदुखी वाढली.. उत्पल पर्रीकर उद्या पणजीतून भरणार उमेदवारी अर्ज - पणजी विधानसभा मतदारसंघ
दिवंगत भाजप नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर हे उद्या पणजीमधून विधानसभा निवडणुकीसाठी ( Goa Assembly Election 2022 ) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
उत्पल पर्रीकर
पणजी : भाजपच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे उत्पल पर्रीकर हे उद्या पणजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार ( Goa Assembly Election 2022 ) आहेत. उत्पल यांच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. उत्पल हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र आहेत.