नवी दिल्ली : Masks In Crowded Places: नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल (Niti Aayog member VK Paul) यांनी बुधवारी लोकांना कोविड व्हॅक्सीनचा डोस घेण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचा सल्ला (use masks in crowded places) दिला आहे. तसेच त्यांनी लोकांना घाबरू नये असे आवाहन देखील केले आहे. पॉल यांनी स्पष्ट केले की, "आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आतापर्यंत कोणताही बदल झालेला नाही. मात्र लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे. ज्यांना एकापेक्षा अधिक व्याधी आहेत किंवा जे वृद्ध आहेत त्यांनी याचे पालन केले पाहिजे", असेही ते म्हणाले. आत्तापर्यंत भारतातील पात्र लोकसंख्येपैकी केवळ 27-28 टक्के लोकांनी कोविड-19 च्या तिसरा डोस घेतला आहे.
आरोग्य मंत्र्यांची आढावा बैठक : चीनमध्ये गेल्या काही दिवसात कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर (Health minister meeting on covid) पॉल यांनी हे विधान केले. "काही देशांमध्ये कोविड-19 ची वाढती प्रकरणे पाहता, मी आज तज्ञ आणि अधिकार्यांसह परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना अद्याप संपलेला नाही. मी सर्व संबंधितांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यास तयार आहोत", असे मांडविया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आयुषच्या फार्मास्युटिकल विभाग आणि बायोटेक्नॉलॉजी विभागाचे आरोग्य सचिव आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे महासंचालक राजीव बहल, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल आणि लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) चे अध्यक्ष डॉ. एन के अरोरा या बैठकीला उपस्थित होते.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे सूचना : जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि चीनमधील प्रकरणांची वाढ लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड पॉझिटिव्ह नमुन्यांची संपूर्ण जीनोम क्रमवारी वाढवण्याचे आवाहन केले आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले होते की, अशा प्रकारच्या खबरदारींमुळे देशात फिरत असलेल्या नवीन कोरोना व्हॅरिएंटचा वेळेवर शोध घेणे शक्य होईल आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाय हाती घेणे सुलभ होईल.
रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग तपासणी: काही देशांमध्ये कोविड (COVID-19) च्या अलीकडील वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांचे नमुने पाठवण्यास सांगितले genome sequencing of COVID positive samples आहेत. जेणेकरुन कोरोनाचा नवीन प्रकार असल्यास, त्याला शोधले जाऊ शकते. आरोग्य मंत्रालय या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून covid cases in world आहे. जपान, युनायटेड स्टेट्स, कोरिया प्रजासत्ताक, ब्राझील आणि चीन या देशांना अचानक झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर SARS-CoV-2 चा नवीन प्रकार शोधण्यासाठी सर्व कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांचे नमुने पाठवण्यास सांगितले आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.
चीनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी प्रमाणात वाढ : कोविड -19 निर्बंध शिथिल केल्यानंतर, चीनमध्ये कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चीनमध्ये रुग्णालये पूर्णपणे भरून गेली आहेत, असे एरिक फीगल-डिंग, महामारीशास्त्रज्ञ आणि आरोग्य अर्थशास्त्रज्ञ यांनी नोंदवले. एपिडेमियोलॉजिस्टचा अंदाज आहे की, पुढील 90 दिवसांत चीनच्या 60 टक्क्यांहून अधिक आणि पृथ्वीच्या 10 टक्के लोकसंख्येला संसर्ग होण्याची शक्यता आहे. लाखो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. (Covid Spike in China)