महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sonia Gandhi ED inquiry : सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरून संसदेत गदारोळ, कायद्यापुढे सर्व सारखे आहेत की नाही? केंद्रीय मंत्र्याचा सवाल - सोनिया गांधी ईडी चौकशी

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ( Sonia Gandhi ED inquiry ) यांना आज ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. नॅशनल हेराल्ड संबंधी मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. मात्र, त्यांच्या चौकशी आधीच देशात काँग्रेस पक्षाकडून ( Uproar in Parliament over Sonia Gandhi ED inquiry ) ईडी आणि केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली जात आहे. या विरोधाची ठिणगी ( Lok Sabha adjourned ) संसदेतही पडली आहे.

Uproar in Parliament over Sonia Gandhi ED inquiry
Uproar in Parliament over Sonia Gandhi ED inquiry

By

Published : Jul 21, 2022, 12:42 PM IST

Updated : Jul 21, 2022, 12:52 PM IST

नवी दिल्ली -काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज ईडीसमोर ( Sonia Gandhi ED inquiry ) हजर राहावे लागणार आहे. नॅशनल हेराल्ड संबंधी मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. मात्र, त्यांच्या चौकशी आधीच देशात काँग्रेस पक्षाकडून ईडी ( Uproar in Parliament over Sonia Gandhi ED inquiry ) आणि केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली जात आहे. या विरोधाची ठिणगी संसदेतही पडली आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमध्ये घोषणाबाजी झाल्याने तेथील कामकाज तहकूब ( Lok Sabha adjourned ) करण्यात आले आहे. लोकसभेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी विरोधकांवर चांगलेच संतापले. कायद्यापुढे सर्वे सारखे आहेत की नाही? काँग्रेस अध्यक्ष काय सुपर ह्यूमन आहेत का? काँग्रेस स्वत: ला कायद्याच्या वरती समजते काय? असा संतप्त सवाल करत जोशी यांनी विरोधकांना धारेवर धरले.

हेही वाचा -Fire on INS Vikramaditya : आयएनएस विक्रमादित्यला लागली आग, कुठलीही जीवितहानी नाही

सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात देशात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. चौकशीसाठी सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. सोनिया गांधी यांची आज ईडी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. त्याच्या निषेधार्थ आणि सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काँग्रेस मुख्यालय परिसरात ही घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, सोनिया गांधी चौकशीसाठी येणार असल्याने ईडी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काही ठिकाणी बॅरिकेडींगही करण्यात आले आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची चौकशीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदारांनी केंद्र सरकारच्या विरोधात संसदेत निदर्शने केलीत. तसेच, या देशव्यापी निषेधाचा एक भाग म्हणून नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने समन्स बजावलेल्या सोनिया गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते, एनएसयूआयने बिहारच्या पाटना येथे निषेध केला. तसेच, देशाच्या इतर भागांत देखील सोनिया गांधीच्या समर्थनात ईडीविरोधात आंदोलने होत आहेत.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी या ईडीसमोर हजर होण्याच्या पार्श्वभूमीवर संसदेतील काँग्रेस खासदार 24, अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयाकडे निघाले. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर देखील सामील आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यात आहेत. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान, आम्ही शांतीपूर्ण पद्धतीने विरोध करत असून ते आमचा आवाज दाबू शकत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार दिपेंदर हुड्डा यांनी दिली.

हेही वाचा -Punjab CM Bhagwant Mann : मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीतील रुग्णालयात भरती, संसर्ग झाल्याची माहिती

Last Updated : Jul 21, 2022, 12:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details