नवी दिल्ली : भारताबाहेर राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता 10 देशांमधील अनिवासी भारतीय (एनआरआय) आता भारतीय नंबर नसतानाही यूपीआय पेमेंट करू शकतात. म्हणजेच आता लवकरच त्यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरूनच यूपीआयए पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे. या सिंगापूर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, सौदी अरेबिया, यूएई आणि यूके या 10 देशांचा समावेश आहे. त्यामुळे जर आता तुम्ही भारताबाहेर जरी राहत असला तरी घरच्यांना व्यवहार सुलभ होतील.
30 एप्रिलपर्यंत वेळ : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मते, आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबर असलेले भारताबाहेर राहणारे भारतीय यूपीआय वापरून व्यवहार करू शकतात. पेमेंट कॉर्पोरेशनने नागरिकांना बँकांना निर्देशांचे पालन करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत वेळ दिला आहे. एनआरइ खाते एनआरआयला परदेशी कमाई भारतात हस्तांतरित करण्यात मदत करते. तर एनआरओ खाते त्यांना भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीला भारतातीय चलनात व्यवहार करण्यात मदत करते.
यूपीआय पेमेंट अटी : यूपीआय पेमेंटसाठी फक्त अटी म्हणजे एवढ्याच आहेत की बँकांनी खातेदारांची खात्री करणे गरजेचे आहे. अशा खात्यांना फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट ( एफइएमए ) नियमांनुसार परवानगी आहे का हे पाहा. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे. त्याशिवाय हा पैसा दहशतवाद्यांवा पुरवला तर जात नाही ना याची पाहणी गरजेची आहे.