महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Patna Opposition Meeting : 'तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाही', विरोधकांच्या बैठकीनंतर कोण काय बोललं? जाणून घ्या - विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक

बिहारची राजधानी पाटण्यात आज मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या नेतृत्वात विरोधकांची बैठक झाली. विरोधी ऐक्याची पुढील बैठक शिमल्यात होणार आहे. ही बैठक 10 किंवा 12 जुलै रोजी होणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jun 23, 2023, 5:08 PM IST

Updated : Jun 23, 2023, 5:26 PM IST

पाटणा : पाटण्यामध्ये आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बेठकीत आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर विरोधकांचे एकमत झाले आहे. 2024 मध्ये आम्ही भाजपविरुद्ध एकत्र लढून भाजपला सत्तेतून बेदखल करणार असल्याचे कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

नितीश कुमार : आज विरोधी पक्षांची बैठक झाली. सर्वांनी आपापले म्हणणे मांडले. बैठकीत एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचे मान्य करण्यात आले आहे. काही दिवसांनी पुढील बैठक होणार असून, त्यात पुढील स्थिती व दिशा ठरविण्यात येणार आहे. काँग्रेस या बैठकीचे आयोजन करणार आहे.

मल्लिकार्जुन खरगे : एकत्र निवडणुका लढवण्याचा अजेंडा तयार करण्यावर चर्चा सुरू आहे. पुढील बैठक शिमल्यात होणार आहे. 12 जुलैला बैठक होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत आम्ही ते ठरवू. प्रत्येक राज्यात वेगळ्या रणनीतीने चालावे लागेल. 2024 ची लढाई एकजुटीने लढायची आहे. आम्ही नक्कीच यशस्वी होऊ.

राहुल गांधी :ही विचारधारेची लढाई आहे. भारताच्या फाउंडेशनवर आक्रमण होत आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. काही मतभेद असतील, पण एकत्र काम करून विचारधारेचे रक्षण करू. येत्या काही दिवसांत पुन्हा बसून पुढील रणनीतीवर चर्चा करू.

ममता बॅनर्जी :बैठकीत चांगली चर्चा झाली. येथील सभेने जनआंदोलनाची सुरुवात होते. बेठकीत तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. पहिला म्हणजे, आम्ही एकत्र आहोत. दुसरा, आम्ही एकत्र लढू आणि तिसरा, पुढील बैठक शिमल्यात होणार आहे. ममता पुढे म्हणाल्या की, 'आम्हाला विरोधक नका म्हणू. आम्ही पण भारताचे नागरिक आहोत. आम्ही पण भारत माता की जय म्हणतो. भाजप देशात हुकुमशाही पद्धतीन शासन करत आहे. त्यांनी राजभवनला अल्टरनेट शासन बनवले आहे. भाजपला विरोध करणाऱ्यांच्या मागे ईडी लावली जाते. मीडियाला कंट्रोल केलं गेलं आहे. आता जर भाजपची पुन्हा सत्ता आली तर देशात पुढच्या निवडणुका होणार नाही',

मेहबूबा मुफ्ती : भाजप आयडिया ऑफ इंडियाच्या विरोधात आहे. देशात काय चालले आहे, जम्मू - काश्मीर हे त्याचे उदाहरण आहे. आज जेव्हा आपण पाहतो आहोत की देशात लोकांशी कसे वागले जात आहे, म्हणूनच आज आपण सर्वजण येथे जमलो आहोत. आम्ही गांधींचा देश गोडसेचा देश होऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

उद्धव ठाकरे :आमची विचारधारा वेगळी आहे, पण देश एक आहे. देशाची एकता कायम ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. लोकशाहीवर आघात करणाऱ्यांचा आम्ही विरोध करणार आहोत. देशात हुकूमशाही आणू इच्छिणाऱ्यांना आम्ही विरोध करू.

ओमर अब्दुल्ला :आमचा उद्देश सत्ता मिळवणे नाही. ही लढाई सत्तेसाठी नसून देश वाचवण्याची लढाई आहे. या देशाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही भेटलो आहोत. काल पंतप्रधान अमेरिकेत लोकशाहीबद्दल बोलत होते. पण ही लोकशाही काश्मीरमध्ये का नाही? चार राज्यांत निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तयारीची ही पहिली पायरी आहे. भविष्यातही चांगले निर्णय होतील.

बैठकीला कोण-कोण उपस्थित होते : विरोधी पक्षांच्या बैठकीत 15 पक्षांचे 27 नेते उपस्थित होते. बैठकीला नितीश कुमार, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, मल्लिकार्जुन खरगे, भगवंत मान, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, उद्धव ठाकरे, शरद पवार, लालू प्रसाद, अखिलेश सिंह यादव, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, टीआर बाळू, दीपंकर भट्टाचार्य, अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओब्रायन, केसी वेणुगोपाल, सुप्रिया सुळे, मनोज झा, फिरहाद हकीम, प्रफुल्ल पटेल, राघव चढ्ढा, संजय सिंग. संजय राऊत, राजीव रंजन सिंग उर्फ ​​लालन सिंग, संजय झा, सीताराम येचुरी, आदित्य ठाकरे डी राजा यांनी हजेरी लावली.

हेही वाचा :

  1. JP Nadda : 'इंदिरा गांधींनी ज्यांना तुरुंगात टाकले तेच आज..' जेपी नड्डांची विरोधकांवर टीका
  2. Patna Opposition Meeting: विरोधकांची एकजूट कधीच शक्य नाही, पाटणामध्ये फोटो सेशन आहे - अमित शाह
Last Updated : Jun 23, 2023, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details