हैदराबाद (तेलंगणा) : Rajnath Singh To Meet Prabhas संरक्षण मंत्री राजनाथ सिंह Union Minister Rajnath Singh हे ज्येष्ठ तेलुगू अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री कृष्णम राजू यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. राजू यांचे नुकतेच निधन झाले krishnam rajus demise आहे. 16 सप्टेंबर रोजी राजू यांच्या शोक सभेलाही सिंह उपस्थित राहणार आहेत.
'बाहुबली' स्टार प्रभास, जो कृष्णम राजूचा पुतण्या आहे. सिंह राजू यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत त्यावेळी प्रभासही उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, असे भाजपच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले. कृष्णम राजू (83) यांचे 11 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते दोन वेळा लोकसभेचे सदस्य होते आणि त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केले होते.