मंडला(मध्य प्रदेश) - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर नंदीग्राममध्ये झालेला हल्ला आणि पूर्व केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यातच केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी यशवंत सिन्हांवर टीका केली आहे. सिन्हांना राजकारणाचे अपचन झाल्याचे म्हणत सिन्हांवर निशाणा साधला. ज्यांचे शरीर चालत नाही, ते सोडून गेले तरी भाजपाला काहीच फरक पडत नसल्याचे ते म्हणाले. तर, दुसरीकडे ममता बॅनर्जी जखमी झाल्या या प्रकरणाला फग्गन सिंह कुलस्ते यांनी बंगालचे नाटक म्हटले.
बंगालच्या राजकारणात नाटक -
ममता बॅनर्जी हताश झाल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार होण्याची गरज आहे, असे फग्गन सिंह म्हणाले. बंगालच्या राजकारण नाटक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गाडीत चढता-उतरता झालेल्या जखमेचा निवडणुकांशी काहीच संबंध नाही. मात्र, ममता दीदींना जनतेचा रोष दिसत आहे आणि त्यांना वाटतंय की हा रोष भाजपाच्या पारड्यात मतांच्या रुपात जाईल. याच कारणामुळे एवढा दिर्घ काळ मुख्यमंत्री राहिलेल्या ममता दीदी भाषेची मर्यादा विसरल्या असून त्या गुंडे-मवाली सारखे शब्द वापरत असल्याचं फग्गन सिंह कुलस्ते म्हणाले.