पणजी (गोवा) -तुम्ही पूर्ण बहुमताने राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात आणा, मी आणि नरेंद्र मोदी राज्याचा दुप्पट वेगाने विकास करतो, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस, तृणमूल आणि आपचा चांगलाच समाचार घेतला. ते आज गोव्यात भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
हेही वाचा -जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका; किरीट सोमैया ट्वीटमध्ये म्हणाले...
साठ वर्षांत काँग्रेसने देशाची पूर्ण वाट लावली होती, मात्र मागच्या ७ वर्षांत राज्यात बहुमताच्या जोरावर भाजपने राम मंदिर, कलम ३७०, ट्रिपल तलाक यांसारखे निर्णय संसदेत बहुमताच्या जोरावर घेतले आहेत, त्यामुळे देशाचा विकास झाला आहे. त्याचप्रमाणे राज्याचा विकास करायचा असेल तर, पूर्ण बहुमताच्या जोरावर पुन्हा एकदा भाजपला राज्यात सत्ता द्या, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यातील जनतेकडे केली.
मनोहर पर्रीकर आधुनिक गोव्याचे शिल्पकार
माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कारकिर्दीत राज्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यांच्यामुळेच राज्याचा विकास होऊन गोव्याची ओळख ही आधुनिक गोवा, अशी झाली आहे. त्यामुळेच, मनोहर पर्रीकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार आहेत, अशा भावना अमित शहा यांनी गोमांतकीयांपुढे व्यक्त केल्या.
शहा यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- ६० वर्षांत काँग्रेसला जे शक्य झाले नाही, तो विकास भाजपने मागच्या ७ वर्षांत केला.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची ओळख नवा भारत, मोदींचा भारत, अशी झाली आहे.
- देशात बहुमतामुळे अनेक निर्णय घेणे शक्य झाले.
- काँग्रेस काळात सगळेच मंत्री स्वतःला पंतप्रधान समजायचे, फक्त पंतप्रधान मनमोहन सिंग सोडून.