महाराष्ट्र

maharashtra

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने दिल्या कुतुबमिनार परिसरात उत्खनन करण्याच्या सूचना

By

Published : May 22, 2022, 6:40 PM IST

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ( Union Ministry of Culture ) दिल्लीतील ऐतिहासिक कुतुबमिनार परिसरात उत्खनन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्रालयाने कुतुबमिनारमध्ये ठेवलेल्या हिंदू देवतांच्या मूर्तींची Iconography तयार करण्याचा आदेश दिले आहेत.

कुतुबमिनार
कुतुबमिनार

नवी दिल्ली - केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ( Union Ministry of Culture ) दिल्लीतील ऐतिहासिक कुतुबमिनार परिसरात उत्खनन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्रालयाने कुतुबमिनारमध्ये ठेवलेल्या हिंदू देवतांच्या मूर्तींची Iconography तयार करण्याचा आदेश दिले आहेत. या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाकडून ( Archaeological Survey of India ) उत्खनन करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव आणि अधिकाऱ्यांनी कुतुबमिनारची पाहणी केली होती. त्यानंतर पुरातत्व विभागाला येथे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुतुबमिनारच्या दक्षिणेला आणि मशिदीपासून 15 मीटर अंतरावर उत्खननाचे काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. मंत्रालयाने केवळ कुतुबमिनारच नाही तर अनंगटाल आणि लाल किल्ल्याचेही उत्खनन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उत्खननाचा निर्णय घेण्यापूर्वी सांस्कृतिक सचिव गोविंद सिंह मोहन यांनी 12 अधिकाऱ्यांच्या पथकासह कुतुबमिनारला भेट दिली होती. ज्या टीममध्ये तीन इतिहासकार, चार पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि तपास पथक होते. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुतुबमिनारचे उत्खनन यापूर्वी 1991 मध्ये झाले होते. त्यानंतर आता होणार आहे.

काय आहे कुतुबमिनारचा वाद..?

हिंदू संघटनेचा दावा आहे की कुतुबमिनार हा प्रत्यक्षात विष्णू स्तंभ आहे आणि मुस्लिम आक्रमकांनी जैन हिंदू मंदिरे पाडली होती आणि त्या ठिकाणी मशीद बांधली होती. कुतुबमिनारमध्ये ठेवलेल्या गणेशमूर्ती दुसऱ्या ठिकाणी हलवून त्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यास मनाई केली होती. गेल्या काही महिन्यांपासून हिंदू समर्थक संघटनांनी कुतुबमिनारबाहेर हनुमान चालीसाचे पठणही सुरू केले होते.

महत्वाच्या व विश्वसनीय बातम्यांसाठी डाउनलोड करा ईटीव्ही भारतअॅप

ABOUT THE AUTHOR

...view details