महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : 'हे' 43 नेते आज मंत्रिपदाची घेणार शपथ - केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार

दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारमध्ये पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेबदल होणार आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील भाजप नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळेल, अशी आशा आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार

By

Published : Jul 7, 2021, 2:49 PM IST

Updated : Jul 7, 2021, 5:02 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होताना ४३ नेते आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. सुत्राच्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाचा सायंकाळी ६ वाजता विस्तार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या सरकारी निवासस्थानी बुधवारी उच्चस्तरीय बैठक झाली.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या यादीत महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड व भारती पवार यांचा समावेश आहे.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे उपस्थित होते. त्याचबरोबर मीनाक्षी लेखी, सारबनंदा सोनोवाल, जी. के. रेड्डी, किरेन जिज्जू, ज्योतिरादित्य सिंदिया, पुरषोत्तम रुपाला, निशिथ प्रामाणिक, अपला दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांचा समावेश आहे. जनता दलाचे (संयुक्त) नेते आरसीपी सिंह आणि लोक जनशक्ती पक्षाच्या नेत्या पशुपती पारस हेदेखील लोकमान्य मार्गावरील बैठकीला उपस्थित होते. दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारमध्ये पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेबदल होणार आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील भाजप नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळेल, अशी आशा आहे.

हेही वाचा-भारताचं 'सर्वात तरुण' कॅबिनेट, केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार; महाराष्ट्रातून कोणाला मिळणार मंत्रिपद?

काही केंद्रीय मंत्र्यांनी दिला राजीनामा-

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला असून मंत्रिपदासाठी चर्चेत असलेले देशभरातील नेते राजधानीत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे काही केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल, केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संतोष गंगवार यांनी माध्यमांशी बोलताना राजीनामाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यावेळी बोलताना नव्या मंत्रिमंडळात आपली काय भूमिका असेल याबद्दल काहीही माहिती नाही असे सूचक विधानही गंगवार यांनी केले आहे.

हेही वाचा-भारताचं 'सर्वात तरुण' कॅबिनेट, केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार; महाराष्ट्रातून कोणाला मिळणार मंत्रिपद?

हे नेते दिल्लीत दाखल-

मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता असलेले देशभरातील अनेक नेतेही दिल्लीत दाखल झाले आहेत. यात काँग्रेसमधून भाजपत आलेले ज्योतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, पशुपती पारस, वरुण गांधी, आरसीपी सिंह यांचा समावेश आहे. याशिवाय मध्यप्रदेशातून राकेश सिंह, यूपीतून अपना दलच्या अनुप्रिया पटेल, रिटा बहुगुणा जोशी, जफर इस्लाम यांच्या नावाची चर्चा आहे. उत्तराखंडमधून माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, अनिल बलुनी, बिहारमधून सुशील मोदी, आरसीपी सिंह, लल्लन सिंह यांचेही नाव चर्चेत आहे.

Last Updated : Jul 7, 2021, 5:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details