महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दाऊदचा हस्तक दानिश चिकनाला न्यायालयात केलं हजर; पाच दिवसांची पोलीस कोठडी - कोण आहे दानिश चिकना

ड्रग माफिया दानिश चिकनाला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दानिशला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई एनसीबीची टीम खूप वेळापासून दानिशच्या मागावर होती. त्यामुळे कोठडीत एनसीबीला दानिश चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Underworld don Dawood ibrahim,   Kota police sought remand,   henchman Danish chikna apeared in court ,  दानिश चिकना, ड्रग माफिया दानिश चिकना
दानिश चिकना

By

Published : Apr 3, 2021, 12:36 PM IST

कोटा (राजस्थान) -डोंगरीत दाऊदची ड्रग्ज फॅक्टरी सांभाळणारा ड्रग माफिया दानिश चिकना याला राजस्थान पोलिसांनी गुरुवारी कोटामधून अटक केली. त्यानंतर त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दानिशला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई एनसीबीची टीम खूप वेळापासून दानिशच्या मागावर होती. त्यामुळे कोठडीत एनसीबीला दानिश चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पोलिसांनी दानिश चिकनाच्या गाडीतून ड्रग्स जप्त केले होते. गुरूवारी रात्री एनसीबीने राजस्थानमधील कोटामध्ये ही कारवाई केली.

दाऊदचा हस्तक दानिश चिकनाला न्यायालयात केलं हजर..

दानिशच्या नावावर ६ पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. दानिश मुंबईतील डोंगरी येथून फरार झाला होता. मुंबई एनसीबीची टीम खूप वेळापासून दानिशच्या मागावर होती. मुंबईत वास्तव्यास असणारा दानिश चिकना उर्फ दानिश फँंटम या नावाने अंडरवर्ल्डमध्ये प्रसिध्द आहे. त्याच्या नावावर मुंबईत सहा वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दानिशकडे अमली पदार्थ विक्रीचे मोठे जाळे असल्याने दानिश चिकना हा दाऊद इब्रहिम टोळीतील खास सदस्य मानला जातो. मुंबईत तो अनेक लोकांना अमली पदार्थं पुरवण्याचेही काम करत होता. त्याच्यासोबत एक मोठी टोळीही सक्रिय होती.

कसे पकडले चिकनाला

एनसीबीने तो कोटाला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. या प्रकरणी कोटा पोलीस त्याच्या कारवायांवर लक्ष ठेवून होती. त्यांनी हायवेवर नाकाबंदी केली होती. त्यातील एका गाडीत पोलिसांना मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आढळले. त्यात आरोपी दानिश चिकनाही गाडीत होता. तेव्हा, पोलिसांनी त्याला अटक केली.

हेही वाचा -बंदीचा आदेश झुगारुन बावधन येथे बगाड यात्रा, शंभरहून अधिक जणांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details