प्रयागराज :उमेश पाल हत्याकांडातील आरोपी बाहुबली अतिक अहमद आणि त्याचा धाकटा भाऊ खालिद अझीम उर्फ अशरफ सध्या पोलीस कोठडीत आहेत. गुरुवारी रात्रीपासून पोलिस या दोघांची चौकशी करत आहेत. कोठडी रिमांड दरम्यान, पोलीस या दोघांकडून उमेश पालची हत्या का केली, हत्येच्या कटात कोण सहभागी आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय अतिक अहमदकडून पाकिस्तानातून शस्त्रास्त्रे आणि काडतुसे मिळाल्याचे प्रकरणही समोर आले आहे. पोलीस याबाबतही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी दोघांना 15 तासात 15 प्रश्न विचारले. मात्र, दोघांनीही बहुतांश प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले.
दोघांची समोरासमोर बसून चौकशी : अतिक आणि अशरफ यांना रिमांडवर घेतल्यानंतर पोलिसांनी दोघांना थेट धूमगंज पोलिस ठाण्यात नेले. येथे पोलिसांची अनेक पथके सतत अतिक आणि अशरफ यांची चौकशी करत आहेत. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास अतिक आणि अशरफसह पोलिसांचे पथक पोलिस ठाण्यात पोहोचले. यानंतर पोलिसांनी पहाटेपर्यंत त्यांना 10 प्रश्न विचारले. पोलिसांनी दोघांची वेगवेगळ्या खोलीत चौकशी केली. यानंतर शुक्रवारी पहाटे दोघांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली.
पोलिसांनी अतिक आणि अश्रफ यांना विचारलेले प्रश्न :
- उमेश पालचा खून का केला?
- उमेश पाल यांच्या हत्येचा कट कधी रचला?
- उमेशसोबत उपस्थित पोलिसांना मारण्याचे आदेश कोणी दिले?
- हत्या घडवून आणणाऱ्या टीमचा प्रमुख कोण होता?
- घटनेच्या वेळी किती लोक तुमच्यासोबत उपस्थित होते?
- प्लॅनमध्ये काही अडथळा आल्यास बॅकअपसाठी काय योजना होती?
- जे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त घटनेच्या वेळी किंवा घटनास्थळाजवळ इतर कोण कोण होते?
- ही हत्या करण्यासाठी शूटर्सची निवड कोणी केली होती?
- घटनेपूर्वी आणि नंतर हत्या करणाऱ्या शूटर्सना कोणी आर्थिक मदत केली?
- घटनेनंतर कोण कोणाच्या मदतीने पळून गेला? पळून जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था कोणी केली?
- घटनेत वापरण्यात आलेल्या बंदुका कुठून आल्या? गोळीबार करणाऱ्यांना बंदुका कोणी दिल्या?
- पाकिस्तानातून शस्त्रे आणि काडतुसे कशी मिळाली?
- पाकिस्तानातून येणारी शस्त्रे आणि काडतुसे अतिकच्या टोळीपर्यंत कशी पोहोचली?
- पाकिस्तानातून आलेली शस्त्रे तुम्ही स्वत: वापरलीत की दुसऱ्याला पुरवलीत, पाकिस्तानी शस्त्रे कोणाला विकली?
- पाकिस्तानी तस्करांशी कोणाच्या माध्यमातून संपर्क केला आणि त्यांनी त्यांना पैसे कसे दिले?