महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ukraine Russia War 31st Day : युक्रेन-रशिया युद्ध एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखे - जो बायडेन

युक्रेनमध्ये 1,351 रशियन सैनिक मारले गेले आणि 3,825 जखमी झाले, असे रशियाचे डेप्युटी चीफ ऑफ मिलिटरी जनरल स्टाफ यांनी सांगितले आहे. युद्ध आज ३१ व्या दिवसात दाखल झाले आहे. युरोपियन युनियनने सांगितले की युक्रेनमधील सुमारे 3.5 दशलक्ष लोक देश सोडून पलायन केले आहेत. त्याचवेळी अमेरिका, भारत, चीन, ब्रिटनसह इतर बलाढ्य देश या युद्धावर लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे बिडेन यांनी युक्रेनमधील निर्वासितांना आश्रय दिल्याबद्दल पोलंडचे कौतुक केले. युक्रेनमध्ये तात्काळ युद्धविराम करण्याच्या गरजेवर भारत आणि चीनचे एकमत झाले आहे.

By

Published : Mar 26, 2022, 10:24 AM IST

Ukraine Russia War
Ukraine Russia War

कीव - युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाला एक महिना पूर्ण झाला आहे. आज युद्धाचा ३१ वा दिवस आहे. लढा सुरूच आहे. युक्रेनमधील विध्वंस थांबत नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले. हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखे आहे. पोलंडच्या सीमेला भेट देताना, त्यांनी काही अमेरिकन सैनिकांचीही भेट घेतली. मानवतावादी मदतीसाठी आणि नाटोच्या पूर्वेकडील पोलंड सीमेवर अमेरिकन सैन्य पाठवण्यात आले आहे. बायडेन यावेळी म्हणाले, युरोप दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या निर्वासित संकटाचा सामना करत आहे.

पोलंडचे कौतुक - रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणातून पळून गेलेल्या २० लाखांहून अधिक निर्वासितांना आश्रय दिल्याबद्दल जो बायडेन यांनी पोलंडचे कौतुक केले. बायडेन यांनी मानवतावादी तज्ञांची भेट घेऊन लोकांच्या वाढत्या समस्यांवर मात करण्यासाठी काय केले पाहिजे यावर चर्चा केली. दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवर संभाषण केले. अनेक मुद्द्यांवर सुमारे एक तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. रशिया-युक्रेन संघर्षामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचाही यात समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details