उज्जैन: कोरोनानंतर मुलांचा स्क्रीन टाइम खूप वाढला आहे. कोरोनाच्या काळापासून मुले मोबाईलचा इतका वापर करू लागली आहेत की त्यांची ही सवय झाली आहे. सोशल साइट्सच्या वापराच्या व्यसनामुळे मानसिक आजारी पडू लागली आहेत. सोशल नेटवर्किंग साइट्स आणि ऑनलाइन गेम्सच्या दुष्परिणामांची अनेक प्रकरणे समोर येत राहतात. तसेच ऑनलाइन गेमने अनेक मुलांना गुन्हेगार बनवले आहे. त्याचे दुष्परिणाम उज्जैनमधून समोर आले आहेत. जिथे गे खेळायला आईने नकार दिला म्हणून मुलाने नाराज होऊन घर सोडले ( Online Gaming Addiction ) आणि मुंबई शहराचा रस्ता धरला.
सायकलने पोहोचला इंदूरला: मकसी रोडवरील कैलास एम्पायर कॉलनीत राहणारा 15 वर्षीय किशोर इयत्ता 8वीचा विद्यार्थी आहे. त्याच्या आईने त्याला ऑनलाइन मोबाइल गेम खेळल्याबद्दल फटकारले, तेव्हा तो घरातून निघून गेला. मुलाने आईचे बोलणो इतके गांभीर्याने ( mother scolds boy left home ujjain ) घेतले की, शाळेत जाण्याऐवजी तो सायकलने थेट इंदूरला गेला. तो घरी न परतल्याने घाबरलेल्या पालकांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर टीमच्या मदतीने काही तासांतच इंदूरमधील मरीमाता चौराहा येथून मुलाला रेस्क्यू केले.
सोबत घेऊन गेला होता आईचा मोबाईल -सीएसपी विनोद कुमार मीणाने सांगितले की, मुलगा आईचा मोबाईल सोबत घेऊन गेला होता. ज्यामुळे त्याला ट्रेस करुन त्याच्या लोकेशनचा पत्ता आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला शोधण्यात आम्हाला यश आले. चौकशीत किशोरने सागिंतले की, आई-बाप त्याला कुठे फिरायला घेऊन जात नाहीत आणि त्याला गेम खेळू देत नाहीत. या कारणामुळे त्याला मुंबईला जायचे होते. दरम्यान मुलाला पालकाकडे देण्यापूर्वी त्याला चाइल्ड केयरकडे सुपुर्द केले गेले, जिथे त्याची व्यवस्थित चौकशी केली जाऊ शकेल. ज्यामुळे त्याने पुढे जाऊन असे पाऊल पुन्हा उचलू नये.