महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tailor Kanhaiya Lal Murder: उदयपूर टेलर हत्याकांडावरून बॉलिवूडमध्ये संताप, वाचा, कोणा काय म्हणाले

येथील शिंपी कन्हैयालालच्या निर्घृण हत्येने लोकांमध्ये एक भितीचे वातावरण आहे. कन्हैयालाल यांच्या आठ वर्षांच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्यानंतर या कन्हैया यांचा खून करण्यात आला. ( Tailor Kanhaiya Lal Murder ) या भीषण घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. आता या घटनेवर बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

उदयपूर टेलर हत्याकांडावरून बॉलिवूडमध्ये संताप
उदयपूर टेलर हत्याकांडावरून बॉलिवूडमध्ये संताप

By

Published : Jun 29, 2022, 3:22 PM IST

उदयपूर (राजस्थान) - येथील शिंपी कन्हैयालालच्या निर्घृण हत्येने लोकांमध्ये एक भितीचे वातावरण आहे. कन्हैयालाल यांच्या आठ वर्षांच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. ( Udaipur tailor kanhaiya lal murder ) त्यानंतर या कन्हैया यांचा खून करण्यात आला. या भीषण घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. आता या घटनेवर बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

कंगना राणौत, लकी अली, कमाल आर खान, अनुपम खेर, स्वरा भास्कर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सर्व कलाकारांनी धर्माच्या नावाखाली टेलरच्या हत्येवर उघडपणे टीका केली आहे. ( Udaipur tailor kanhaiya lal murder ) गायक लकी अलीने कन्हैया यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे. लकी अलीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, ही हत्या संपूर्ण मानवतेची हत्या आहे, कृपया त्याला शिक्षा द्या अशी मागणी त्याने केली आहे.

कंगना रणौतने लिहिले आहे की, 'ज्या प्रकारे कन्हैयालालच्या हत्येचे व्हिडीओ बनवले गेले आहेत, ते पाहण्याची माझी हिम्मत होत नाही, मला धक्का बसला आहे. अनुपम खेर रागाने लिहितात, 'भयभीत.. दुःखी.. रागावलेले'. या निंदनीय घटनेवर पाकिस्तानी कलाकार केआरकेने ट्विट करून लिहिले आहे की, 'पैगंबर मोहम्मद यांनी कधीही कोणाला शारीरिक इजा केली नाही, त्यामुळे कोणीही इस्लामचा वापर करून असे गुन्हे करू नये' असही म्हणाले आहेत.

राजस्थानमधील उदयपूरमध्येटेलर कन्हैयालाल यांच्या आठ वर्षांच्या मुलाने नुपूर शर्माच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. यामुळे काही लोक संतापले. त्याचवेळी कन्हैयालालने स्वतःच्या हत्येची भीती व्यक्त करत पोलीस संरक्षण मागितले. मात्र, त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले नाही. त्याचवेळी 28 जून रोजी दोन तरुण कपडे शिवण्याच्या बहाण्याने दुकानात आले आणि त्यांनी टेलरचा गळा चिरून खून केला. दरम्यान, या घटनेचा त्यांनी व्हिडिओही पोस्ट केला आहे.

हेही वाचा -बंडखोर आमदार दुपारी साडेतीन वाजता गुवाहाटीहून गोव्याला रवाना होणार

ABOUT THE AUTHOR

...view details