महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Udaipur Jaipur Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेस उलटवण्याचा प्रयत्न; ट्रॅकवर दगड अन् रॉड, पाहा व्हिडिओ

Udaipur Jaipur Vande Bharat : उदयपूर-जयपूर 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा (Udaipur-Jaipur Vande Bharat Express ) मोठा घातपात टळला आहे. लोको पायलटनं दाखवलेल्या प्रसंगावाधानामुळं वंदे भारत एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना टळली. या वंदे भारतला पंतप्रधान मोदींनी 24 सप्टेंबरला हिरवा झेंडा दाखवला होता.

Etv Bharat
वंदे भारत अपघात

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 8:34 PM IST

रेल्वे ट्रॅकवर दगड, रॉड

उदयपूर(राजस्थान) : Udaipur Jaipur Vande Bharat :उदयपूर- जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा घातपात घडवण्याच्या उद्देशानं ट्रॅकवर मोठे दगड आणि रॉड ठेवण्यात आले होते. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रॅकवरुन उलटवण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र, लोको पायलटच्या प्रसंगावाधानामुळं मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी रेल्वेनं गांगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधीच घातपाताचा कट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्तौडगड दौऱ्यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रॅकवरुन उलटवण्याचा कट रचण्यात आला होता. सोमवारी सकाळी काही समाजकंटकांनी उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रॅकवरुन घसरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लोको पायलटच्या सतर्कतेमुळं हा अपघात टळलाय. उदयपूरहून जयपूरला येताना ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात दगड आणि रॉड ठेवण्यात आले होते. त्याचा एक व्हिडिओही समोर आलाय. या व्हिडिओमध्ये कामगार ट्रॅकवरुन दगड हटवताना दिसत आहेत.

गुन्हा दाखल :या घटनेनंतर रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनानं सीआरपीएफलाही घटनेची माहिती दिली. यानंतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी रेल्वेनं गांगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा तपास सुरू केलाय.

लोको पायलटनं दाखवली सतर्कता : मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूरहून निघाल्यानंतर वंदे भारत सकाळी ९.५५ वाजता चित्तौडगडला पोहोचणार होती. दरम्यान, सोनियाना ते गांगरार रेल्वे स्थानकादरम्यानच्या मार्गावर ही घटना घडली. ट्रॅकवर काहीतरी असल्याचं जाणवल्यानं लोको पायलटनं ट्रेन थांबवली आणि घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी ट्रॅकवर मोठे दगड आणि रॉड दिसून आले. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन शशिकिरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलटच्या सतर्कतेमुळं हा अपघात टळला आहे. रेल्वे विभागाकडून तपास सुरू आहे.

हेही वाचा -

  1. Vande Bharat Express Fire : भोपाळहून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला भीषण आग, जीवितहानी नाही
  2. Vande Bharat : वंदे भारत ट्रेनमध्ये मूत्र विसर्जनासाठी जाणे आले अंगलट; प्रवाशाला बसला 6 हजाराचा भुर्दंड
  3. Vande Bharat Train : देशातील 11 राज्यांना गिफ्ट! पंतप्रधान मोदींच्या हस्ते नऊ वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण

ABOUT THE AUTHOR

...view details