कुलगाम (जम्मू-काश्मीर) - जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांनी त्यांच्या पालकांच्या सांगण्यावरून सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले. हे प्रकरण हदीमपूर गावचे आहे. चकमकीपूर्वी सुरक्षा दलांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, ते मान्य करत नव्हते. त्यानंतर दहशतवाद्यांच्या पालकांना बोलावण्यात आले. ( Two terrorists surrender Today ) आधी आई आणि नंतर वडिलांना माईकवर शस्त्रे ठेवण्याचे आवाहन करण्यात आले त्यानंतर त्यांनी शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण केले.
दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त - जर आपण शस्त्रे खाली ठेवली तर त्यांना काहीही केले जाणार नाही, असे सुरक्षा दलाकडून त्यांना सांगण्यात येत होते. काही वेळातच दोन्ही दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. हे दोघेही अलीकडेच दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.