महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Two People Killed In Bull Strike : बैलांच्या शर्यती दरम्यान धडक लागून दोघांचा मृत्यू - कर्नाटकात बैलांची शर्यत

संक्रांतीच्या दिवशी कर्नाटकच्या कोनागनवल्ली गावात आयोजित बैलांच्या शर्यती दरम्यान विरुद्ध बाजूने येणाऱ्या बैलाची धडक लागून एकाचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत शिकारीपुरा तालुक्यातील मालूर गावात बैलांची स्पर्धा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अशाचप्रकारे मृत्यू झाला आहे.

Bull Strike
बैलांच्या शर्यत

By

Published : Jan 16, 2023, 6:19 PM IST

शिवमोग्गा (कर्नाटक) : कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यात संक्रांतीच्या दिवशी बैलांची शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शिवमोग्गा शहरातील अल्कोला कॉलनीत राहणारा लोकेश (३२) हा शिवमोग्गा तालुक्यातील कोनागनवल्ली गावात आयोजित बैलांची शर्यत पाहण्यासाठी गेल्यानंतर रविवारी त्याचा मृत्यू झाला. दुसर्‍या प्रकरणात, शिकारीपुरा तालुक्यातील मालूर गावात बैलांची स्पर्धा पाहण्यासाठी गेलेल्या 23 वर्षीय रंगनाथचाही मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू : मजूर म्हणून काम करणारा लोकेश रविवारी संक्रांतीच्या दिवशी सुट्टी असल्याने कोनागनवल्ली गावात आयोजित बैल शर्यत स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी विरुद्ध बाजूने एका बैलाने येऊन लोकेशच्या छातीवर धडक दिली. या धडकेने लोकेश जागीच कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ अयानूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला शिवमोग्गा मॅकगन हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच लोकेशचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुंसी पोलिस ठाण्यात तक्रार : लोकेशला पत्नी, 5 व 3 वर्षांची दोन मुले आणि दीड वर्षांची एक मुलगी आहे. लोकेश त्याच्या कुटुंबात कमावणारा एकमेव व्यक्ती होता. याप्रकरणी मृत लोकेशची पत्नी चंद्रम्मा हिने बैल स्पर्धेच्या आयोजकांविरुद्ध कुणसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बैलगाडी स्पर्धेच्या आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना झाल्याचा आरोप लोकेशच्या कुटुंबीयांनी केला आहे. आयोजकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व जिल्हा प्रशासनाने भविष्यात अशा धोकादायक स्पर्धांना आळा घालावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मालूर गावात घडली दुसरी घटना : दुसऱ्या एका घटनेत शिकारीपुरा तालुक्यातील मालूर गावात बैल स्पर्धा पाहण्यासाठी गेलेल्या रंगनाथ (२३) या तरुणाचा मृत्यू झाला. तो मालूर गावचा रहिवासी होता. तो गावात एक छोटेसे कॅन्टीन चालवत असे. 14 जानेवारीला तो रंगनाथची स्पर्धा पाहण्यासाठी गेला असता धावत्या बैलाने त्याला धडक देत त्याचे पोट फाडले. धडकेनंतर त्याला गंभीर जखमी अवस्थेत तात्काळ शिराळकोप्पा रुग्णालयात आणि नंतर शिकारीपुरा तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे योग्य उपचार न मिळाल्याने त्याला शिवमोग्गा येथील मॅकगन हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत रंगनाथच्या सासऱ्यांनी आयोजकाविरुद्ध शिराळकोप्पा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोनागणवल्ली येथील स्पर्धेत 8 जण जखमी : मिळालेल्या माहितीनुसार, कोनागणवल्ली येथे होणाऱ्या बैल स्पर्धेला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. तसेच मालूर येथे झालेल्या पहिल्या दिवसाच्या स्पर्धेला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र या स्पर्धेला जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. कोनागणवल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत सुमारे 8 जण जखमी झाले आहेत. यातील काहींवर प्रथमोपचार करून ते घरी परतले आहेत. इतर दोघांच्या डोळ्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. या सर्वांवर शिवमोग्गा येथील मेगन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

लोकेशच्या नातेवाईकांची निदर्शने : लोकेशच्या नातेवाईकांनी मॅकगॅन रुग्णालयाजवळ निदर्शने करून अशा धोकादायक स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी देणारे जिल्हा आयुक्त आणि प्रतिनिधींनी आयोजकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी उपस्थित आमदार केबी अशोक नायक यांच्यावर त्यांनी संताप व्यक्त केला. झालेल्या घटनेवर आमदार म्हणाले, अशी दुर्घटना घडायला नको होती. शोकाकुल परिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे. लोकेशच्या कुटुंबासाठी योग्य ती व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. धोकादायक बैल पकडण्याच्या स्पर्धेवर बंदी घालावी. अशा धोकादायक खेळामुळे अनेक मृत्यू होत आहेत. त्यामुळे अशा खेळाला परवानगी देऊ नये, अशी मागणी लोकेशच्या शेजारी राहणाऱ्या कृष्णप्पा यांनी केली आहे.

हेही वाचा :Bull Fight बैलांनी दिली रिक्षाला धडक, एक बालक जखमी, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details