महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Two men raped a woman : रोजंदारी करणाऱ्या महिलेवर दोघांचा बलात्कार, महिलेचा मृत्यू - Hyderabad

दोन नराधमांनी एका महिलेवर बलात्कार ( Rape ) करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेलंगणमधील रंगारेड्डी ( Rangareddy ) जिल्ह्यातील शमशाबाद येथे बुधवारी ही घटना घडली. स्थानिक नागरिकांनी या महिलेला बेशुद्धावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान पिडीतेचा मृत्यू झाला.

महिलेवर अत्याचार
महिलेवर अत्याचार

By

Published : Jun 9, 2022, 10:54 AM IST

हैदराबाद : मदनपल्ली येथील कोठा तांडा येथील ही महिला (४०) रोजंदारीवर काम करीत असे. दररोजप्रमाणे ती आपल्या रोजंदारीच्या ठिकाणी गेली असता दोघेजण तेथे आले. त्यांनी तिला रोजंदारीचे काम देऊ असे सांगितले. तिने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्यासोबत दुचाकीवरून ती गेली. या दोघांनी तिला एका निर्जन स्थळी शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार ( Rape) केला. त्यानंतर त्यांनी तिच्या डोक्यात मोठा दगड मारला आणि तिथून पळून गेले.

स्थानिकांनी केले हॉस्पिटलमध्ये दाखल - काही वेळाने तिथून जात असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांनी ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असल्याचे पाहिले. त्यांनी 100 नंबरवर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पतीचा आठ वर्षापूर्वी मृत्यू - पीडित महिलेचा पती आठ वर्षांपूर्वीच वारला आहे. तिला दोन मुली व एक मुलगा आहे. तीन महिन्यांपूर्वीच तिच्या एका मुलीचे लग्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा -साफसफाईसाठी विहिरीत उतरलेल्या 6 पैकी 5 जणांचा मृत्यू, वायू गळतीने झाले होते बेशुद्ध

ABOUT THE AUTHOR

...view details