लखनऊ (उत्तरप्रदेश): लहानपणापासूनच्या जिवलग मैत्रिणी असलेल्या दोन मुलींचा एकमेकींवर जीव जडला आहे. दोन्ही कुटुंबातील लोक त्यांच्या लग्नाच्या तयारीत मग्न होते. दरम्यान, या दोन्ही मुलींनी घरच्यांनी आणलेल्या स्थळांना नकार देत दोघांनीही एकमेकींच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कुटुंबासमोरही त्यांची इच्छा व्यक्त केली. आपलं नातं टिकविण्यासाठी दोघींनी बंड केले. शनिवारी दोघांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी दोन्ही मुलींचे समुपदेशन करण्यात आले. असे असूनही त्यांनी कुणाचेही ऐकले नाही. स्वत: प्रौढ असल्याचे सांगून दोघांनीही आपले आधारकार्ड पोलिसांना दाखवले. या दोन्ही वयाने अल्पवयीन नसल्याने पोलिसांनी दोघींना एकत्र राहण्याची परवानगी दिली.
मैत्रीचे रूपांतर झाले प्रेमात:इन्स्पेक्टर रहिमाबाद अख्तर अहमद अन्सारी यांनी सांगितले की, शनिवारी दोन कुटुंबे पोलिस ठाण्यात आले. त्यांनी आपल्या मुलींच्या वागणुकीबद्दल सांगितले. दोघीही एकाच गावात राहतात असे सांगितले. दोन्ही कुटुंबातील दोन मुलींमध्ये लहानपणापासूनच एकमेकींविषयी खूप ओढ आहे. अनेकदा दोन्ही मुली एकमेकांच्या घरी येऊन राहायच्या. या दोन्ही मैत्रिणींमध्ये खूप जवळीक होती. घरच्यांचा काही आक्षेप नव्हता. कोणताही अडथळा न येता घरी येताना दोघींच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले.