ऋषिकेश - मुंबईहून उत्तराखंड फिरण्यासाठी गेलेले तीन जण गंगेच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. यात दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. आतापर्यंत तिघांबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाही. मात्र वाहून गेलेल्यांमध्ये महाराष्ट्रातीलस एका आमदाराच्या मुलीचा समावेश असल्याची माहिती आहे. पोलिसांचे पथक त्यांचे शोध घेत आहे. बचाव आणि मदतकार्यासाठी एसडीआरएफलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
मुंबईहून उत्तराखंड फिरण्यासाठी गेलेले तीन जण नदीत वाहून गेले; बुडणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील आमदाराच्या मुलीचा समावेश! - मुंबईहून उत्तराखंड फिरण्यासाठी गेलेले तीन जण नदीत वाहून गेले
मुंबईहून उत्तराखंड फिरण्यासाठी गेलेले तीन जण ऋषिकेशमधील गंगेत बुडाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र, त्यांच्याविषयी अद्याप काही माहिती मिळालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून तीन मुली आणि दोन मुले उत्तराखंड फिरण्यासाठी गेले होते. ते तपोवनमधील गंगा व्ह्यू हॉटेलमध्ये थांबले होते. मेलरॉय डांटे, अपूर्वा केलकर आणि मधुश्री खुरसांगे अशी तीन मुलींची नावे आहेत. मुनी की रेती भागात स्नानासाठी गेले होते. यातील एक मुलगी नदीत वाहून गेली. तिला वाचवण्यासाठी गेलेला मुलगाही वाहून गेला. तर बदनगावजवळ टिहरी तलावात गावकऱ्यांना एका महिलेचा मृतदेह आढळला असल्याची माहिती आहे. यात महाराष्ट्रातील एका आमदाराच्या मुलीचा समावेश असल्याची माहिती आहे. मात्र, या मृतदेहाची ओळख पटली नसून मृतदेह शवागारात पाठवण्यात आला आहे.
एसडीआरएफचे अधिकारी कविद्र सिंह यांनी सांगितले, की आज ऋषिकेशच्या तपोवनापासून ते भीमगौडापर्यंत शोध मोहिम राबविण्यात आली. मात्र अद्यापही कोणाचाही शोध लागू शकला नाही. आज सध्याकाळपर्यंत ही शोध मोहिम सुरू राहणार असल्याचे कविद्र सिंह म्हणाले. शोध मोहिम जवानांकडून ऋषिकेश पासून ते हरिव्दार पर्यंत शोध मोहिम राबविण्यात आली. प्राप्त माहितीनुसार बुडणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील एका आमदाराच्या मुलीचा समावेश असल्याची माहीती आहे. मात्र संबंधित आमदाराचे नाव कळू शकले नाही.