बंगळुरू- कर्नाटकमधील बंगळुरूजवळ असलेल्या देवाराचीक्कानहाळीमध्ये आगीची मोठी घटना घडली आहे. देवाराचीक्कानहाळीमधील अशिर्थ अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत वाढ होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
देवाराचीक्कानहाळीमधील अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये अडकलेल्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आगीचा भडका उडाला असताना ही महिला लोखंडी ग्रीलमुळे अपार्टमेंटमधून बाहेर पडू शकत नाही. दुसरीकडे आगीच्या ज्वालांनी तिला वेढल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. महिला ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असताना अपार्टमेंटबाहेर जमा झालेले नागरिक तिला वाचविण्यासाठी धावा करत होते.
हेही वाचा-महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरण; सुसाईड नोट हाती लागली, त्यात लिहिलंय...