शिमला- हिमाचलमधील किन्नौर येथील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत दोन जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून काढण्यात आले आहे. तर 10 जणांची बचाव पथकाने सुटका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू असलेल्या मदतकार्याला शक्य तेवढी मदत करण्यात येणार असल्याचे ट्विट केले आहे. किन्नौर जिल्ह्यातील रेकॉँग पीओ-शिमला महामार्गावर नुगुलसरी येथे ही दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे.
हिमाचल प्रदेशमधील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मदतकार्य करण्यासाठी शक्य ती मदत करण्याकरिता आश्वस्त केले आहे.
हेही वाचा-'ती' व्हायरल जाहिरात खरंच बुर्ज खलिफावर चित्रित झाली का? एमिरेटसने दिले उत्तर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्विटरवर हिमाचलमधील दुर्घटनेबाबत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याशी चर्चा केली आहे. मदतकार्य करण्याची आयटीबीपीची आणि जखमींवर उपचार करण्याची स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे.