महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

MP Accident : भरधाव जाणारा ट्रक बोलेरोवर जीपवर पलटला, 7 जणांचा जागीच मृत्यू - बोलेरोवर ट्रक पडला

मध्य प्रदेशातील सिधी येथे भरधाव येणारा ट्रक आदळून बोलेरो जीप पलटली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

MP Accident
ट्रक बोलेरोवर जीपवर पलटला

By

Published : Jun 8, 2023, 4:41 PM IST

सिधी : मध्यप्रदेशच्या सीधीमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव जाणारा ट्रक बोलेरो जीपवर पलटी झाला. या दुर्घटनेत बोलेरो जीप पूर्णपणे दबली गेली आहे. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

चालकाविरोधात गुन्हा दाखल : मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो जीप सिधीकडे जात होती. त्याचवेळी भरधाव वेगाने जाणार ट्रक बोलेरो जीपवर पलटला. अपघातात जीपमध्ये असलेल्या 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भरधाव वेग घेतोय बळी : सिधी जिल्ह्यात अपघात होण्याचे सत्र चालूच आहे. काही दिवसापूर्वी अपघात झाल्यानंतर आज पुन्हा एका अपघातात 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ग्रामपंचायत बरम बाबाच्या डोल जवळ एका बोलेरो जीपचा अपघात झाला. यात 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, यात दोन मुलांचा समावेश आहे.

बोलेरोवर ट्रक आदळला :या अपघातातीच माहिती देताना जामोडी पोलीस ठाण्याचे प्रभारी शेषमणी मिश्रा यांनी सांगितले की, ट्रक अचानक अनियंत्रित होऊन खड्ड्यात अडकला. त्यानंतर तेथून जाणाऱ्या बोलेरो जीप या वाहनावर पलटी झाला. त्यामुळे बोलेरो गाडीत असलेल्या सर्वांचा वेदनादायक मृत्यू झाला आहे. मात्र, या वाहनातील प्रवासी कोण होते आणि ते कुठे जात होते, हे स्पष्ट झालेले नाही. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली, सगळीकडे आरडाओरडा झाला.

रेल्वे अपघातांचेही सत्र -गेल्या काही दिवसात ओडिशा आणि मध्यप्रदेशात रेल्वे अपघाताचे सत्र सुरू आहे. ओडिशातील अपघातात तर ३०० बळी गेले आहेत. कालच झालेल्या मध्यप्रदेशातील मालगाडीच्या रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूणच अपघातांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. त्यात आज या अपघाताचे वृत्त आल्याने आणखी एकाची भर पडली आहे.

हेही वाचा-

  1. Odisha Goods Train Derailed : सोसाट्याच्या वाऱ्याने ओडिशात मालगाडी घसरली रुळावरून, 6 मजुरांचा मृत्यू
  2. Karnataka Accident : आंध्रमधून कर्नाटकमध्ये ऊरुसला जाताना क्रुझरचा अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details