महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

TRS Named as BRS: राष्ट्रीय राजकारणात केसीआर यांची एन्ट्री.. पक्षाचे टीआरएस नाव बदलून केले भारत राष्ट्र समिती

TRS Named as BRS: तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) Telangana Rashtra Samithi चे नाव बदलून 'भारत राष्ट्र समिती' (BRS) Bharat Rashtra Samithi असे करण्यात आले आहे. नाव बदल केल्याने आता राष्ट्रीय राजकारणात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची एन्ट्री होणार आहे. KCR Launches National Party

KCR
केसीआर

By

Published : Oct 5, 2022, 3:48 PM IST

हैदराबाद: TRS Named as BRS: तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) Telangana Rashtra Samithi चे नाव बदलून 'भारत राष्ट्र समिती' (BRS) Bharat Rashtra Samithi करण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते केसीआर यांनी बुधवारी दसऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. टीआरएस अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव बुधवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर पक्षाच्या नवीन नावाची घोषणा करतील अशी अपेक्षा होती. KCR Launches National Party

पक्षाचे नाव बदलून त्यांचे 'तेलंगणाचे सुशासन मॉडेल' लोकांपर्यंत पोहचवून योजना राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याच्या आणि भाजपशी प्रभावीपणे सामना करण्याच्या पक्षाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. TRS ची सर्वसाधारण बैठक बुधवारी येथील पक्ष मुख्यालय तेलंगणा भवन येथे पार पडली. यामध्ये नाव बदलाचा ठराव मंजूर करण्यात आला. लोकप्रतिनिधी कायदा आणि संबंधित नियमांनुसार या बदलाची माहिती निवडणूक आयोगाला दिली जाणार आहे.

निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले

नावातील बदलाची माहिती निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे आणि नंतर 6 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष भेटून दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. भारत राष्ट्र समिती हे नाव तेलुगू आणि हिंदीतही सर्वांना समजावे या हेतूने निवडले आहे असे दिसते. हे नाव यापूर्वीच देशभरातील लोकांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले असल्याची माहिती आहे. आज दुपारी तेलंगणा भवनात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पक्षाध्यक्ष केसीआर नाव बदलाचा ठराव मांडला.

283 सदस्यांनी एकमताने मान्यता दिली. केसीआर यांनी दुपारी 1.19 वाजता या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. सदस्यांनी मांडलेल्या ठरावावर त्यांनी निवेदन केले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, जेडीएस नेते कुमारस्वामी, तामिळनाडू व्हीसीके पक्षाचे अध्यक्ष, खासदार थिरुमावलावन आणि इतर विशेष निमंत्रित म्हणून या बैठकीला उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details