आगरतळा- त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी ( Tripura Chief Minister CM resigned ) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द ( Biplab Kumar Deb resigned ) केला आहे. बिप्लब देब यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Biplab Kumar Deb meet Amit Shah ) यांची भेट घेतली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला नव्या चेहऱ्यासह निवडणुकीत उतरायचे आहे. लवकरच पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली जाऊ शकते. या बैठकीत राज्याचा नवा मुख्यमंत्री निवडला जाण्याची शक्यता आहे.
राजीनामा दिल्यानंतर बिप्लब देब म्हणाले, 'संघटनेच्या हितासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ( Biplab Kumar Deb after resignation ) दिला. पक्षाचा निर्णय महत्त्वाचा आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहे. पक्ष हायकमांडने राजीनामा ( high command meet with Tripura CM ) देण्यास सांगितले होते. आता 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करायची ( Tripura assembly elections 2023 ) आहे.