महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

New Zealand Cricket Board: ट्रेंट बोल्ट निवृत्ती घेण्याच्या तयारीत; जाणून घ्या काय आहे कारण - न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट

एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट केंद्रीय करारातून बाहेर ( Trent Boult out of central contract ) पडला आहे. त्यामुळे बोल्टने अप्रत्यक्ष ब्रेक घेतला आहे किंवा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला असल्याचे मानले जात आहे. बोल्टने 78 कसोटीत 317 आणि 93 वनडेत 169 विकेट्स घेतल्या आहेत.

Trent Boult
ट्रेंट बोल्ट

By

Published : Aug 10, 2022, 7:47 PM IST

Updated : Aug 10, 2022, 7:59 PM IST

वेलिंग्टन:क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ( New Zealand fast bowler Trent Boult ) आणि सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर-1 स्थानावर असलेला ट्रेंट बोल्ट कदाचित आता निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून त्याला वगळण्यात आल्याने असे बोलले जात आहे.

केंद्रीय करारातून बाहेर पडण्याचा निर्णय 33 वर्षीय ट्रेंट बोल्टने घेतला असला, तरी न्यूझीलंड बोर्डाने त्यास सहमती दर्शवली ( New zealand cricket board release trent boult ) असली तरी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. बोल्टने निवृत्ती घेण्यास नकार दिला आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि जगभरातील क्रिकेट लीग खेळण्यासाठी त्याने हे सर्व केले आहे. 12 वर्षे देशासाठी क्रिकेट खेळल्याचा अभिमान आहे.

12 वर्षे देशासाठी खेळल्याचा अभिमान -

ट्रेंट बोल्ट म्हणाला ( Trent Boult Statement About Retirement ), 'हा निर्णय माझ्यासाठी खरोखर कठीण होता, मला पाठिंबा दिल्याबद्दल बोर्डाचे आभार. देशासाठी खेळणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते, 12 वर्षे देशासाठी खेळल्याचा अभिमान आहे. माझा निर्णय पूर्णपणे पत्नी गर्ट आणि तीन मुलांवर अवलंबून होता. कुटुंब माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे, क्रिकेटनंतर त्यांना प्राधान्य दिल्याने मला बरे वाटते.

बोल्टचा निवृत्ती घेण्याचा विचार -

ट्रेंट बोल्टच्या या निर्णयानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही चाहत्यांना ते चुकीचे घेऊ नका असे सांगितले आहे. अशा परिस्थितीत बोल्टने अप्रत्यक्षपणे काही काळ विश्रांती घेतली ( Trent Boult out of central contract ) आहे किंवा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला आहे, असा अंदाज बांधला जाऊ शकतो.

हेही वाचा -Icc T20 Rankings : क्रमवारीत भारताच्या क्रिकेटपटूंनी घेतली मोठी झेप; कोण, कोणत्या क्रमांकावर आहे, घ्या जाणून

Last Updated : Aug 10, 2022, 7:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details